Pavane picked up Rs 2 crore and was swept away by Cyber ​​Tech
Pavane picked up Rs 2 crore and was swept away by Cyber ​​Tech 
कोल्हापूर

पावणे दोन कोटी उचलून  सायबर टेकने गुंडाळला गाशा 

डॅनियल काळे

कोल्हापूर  : एजन्सी नेमा, कन्सल्टंट नेमा आणि जबाबदारीतूनच मुक्त व्हा, असा एक फंडाच महापालिकेत अलीकडे काळात तयार झाला आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या एजन्सीवर आजवर कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. या सर्वातून निष्पन्न काय होते, हा एक संशोधनाचाच विषय होईल. अशा एजन्सी, कन्सल्टंट कंपन्यावर झालेला खर्चही वाया जात असल्याचेच बोलले जात आहे. 


घरफाळा विभागातही सायबर टेक नावाची एजन्सी नेमली होती. या एजन्सीने आजवर 1 लाख 75 हजार रुपयांचे बिलही उचलले. आधुनिक पद्धतीने शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करणे आणि घरफाळा विभागाचे उत्पन्न वाढविणे, हा या सर्वेक्षणाचा हेतू होता; मात्र पावणेदोन कोटीचे बिल घेऊन या कंपनीनेही येथून गाशा गुंडाळल्याने महापालिकेचे सर्वेक्षणाचे हे कामही अर्ध्यातच पडले. 
झालेल्या सर्व्हेक्षणाचाही उपयोग नाही, परिणामी घरफाळा विभागाचा महसूल तर वाढलाच नाही पण आहे त्या महसुलातील पावणेदोन कोटी रुपये कंपनीवर खर्च झाले आहेत. 

जकात आणि स्थानिक संस्था कर हे पूर्वी महापालिकेच्या अर्थिक स्त्रोताचे प्रमुख मार्ग होते, पण 2011 ला जकात आणि त्यानंतर काही वर्षांत एलबीटीही बंद झाल्याने महापालिकेचे अर्थिक नुकसान होत गेले. त्यानंतर घरफाळा विभाग हा या मिळकतीचा प्रमुख मार्ग बनला आहे, पण या विभागाच्या उत्पन्नालाही अनेक ठिकाणी गळती होती. अनेक मिळकती या कराच्या जाळ्यातून चुकत होत्या. त्यामुळे तत्कालीन चार वर्षापूर्वी सायबर टेक नावाची एक कंपनी नेमली. या कंपनीकडून मिळकतीचे सर्वेक्षण करून शहरातील सर्व मिळकती कराच्या जाळ्यात आणण्याचा प्रयत्न केला जाणार होता. आधुनिक पद्धतीने केलेल्या सर्वेक्षणामुळे महापालिकेचे उत्पन्न वाढणार, हे उघड होते, पण या सर्वेक्षणाच्या कामातही अनेक ठिकाणी अडथळे आले. या कंपनीवर विविध आरोप झाले. या कंपनीने काही प्रमाणात सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले; पण त्यानंतर या कंपनीने हे कामच बंद केले. 

सायबर टेक कंपनीचे सर्वेक्षण बंद होऊन सुमारे तीन वर्षांहून अधिक काळ गेला आहे. इतक्‍या काळात सहजच सर्वेक्षण पूर्ण झाले असते, 
पण प्रत्यक्षात मात्र सर्वेक्षणाचे हे काम अपुरेच राहिले आहे. त्यामुळे उत्पन्नही वाढले नाही. सर्वेक्षणावर खर्च झाला. प्रत्यक्षात महापालिकेच्या हाती काहीच आले नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत राहतो'; कराराच्या आधारे कोर्टाने केली आरोपीची सुटका

Sanju Samson Fined : अंपायरशी वाद घालणे आले अंगलट... BCCI ची संजू सॅमसनवर मोठी कारवाई; काय आहे संपूर्ण प्रकरण

Kolhapur Lok Sabha : मुश्रीफांच्या सांगण्यावरून कारवाई करत असाल तर मीही छत्रपतीये, याद राखा; संभाजीराजेंचा कोणाला इशारा?

Latest Marathi News Live Update : अमित शहा यांची आज जालन्यात सभा

Share Market Opening: गुंतवणूकदार चिंतेत! शेअर बाजारात पुन्हा घसरण; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT