Penalty For Entering Satawane Village Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

चंदगड तालुक्‍यातील "या' गावामध्ये गणेशोत्सव काळात प्रवेश केल्यास 500 रुपये दंड

सुनील कोंडुसकर

चंदगड ः सातवणे (ता. चंदगड) आणि गणेशोत्सव यांचे गेल्या काही वर्षात अनोखे नाते निर्माण झाले आहे. सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती प्रमाणे दारात मंडप घालून भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना, सजावट, लायटींग, हलते देखावे यामुळे हे गाव जिल्ह्याच्या नकाशावर गणेशोत्सवाचे गाव म्हणून प्रसिध्द झाले. उत्सव काळात हजारो भक्त आणि पर्यटक या गावाला भेट देत असत. परंतु या वर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामपंचायतीने गणेश भक्तांना प्रवेश बंदी केली असून 500 रुपये दंडाचा निर्णय घेतला आहे. 

चंदगड-गडहिंग्लज मार्गावरील सुमारे बाराशे लोकवस्तीच्या या गावात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. वैयक्तीक पातळीवर लाखो रूपयांचा खर्च केला जातो. केवळ हौस म्हणून या उत्सवाचे स्वरुप विस्तारत गेले. एकाने केले मग दुसऱ्याने असे गावात सुमारे दहा ठिकाणी भव्य गणेशमूर्ती आणि सजावट साकारत गेली. ते बघण्यासाठी चंदगड, आजरा, गडहिंग्लजसह सीमाभाग आणि कोकणातूनही पर्ययक येत असत.

उत्सव काळात दररोज रात्री उशीरा पर्यंत गर्दी असायची. खास गाड्या करुन, सहकुटुंब नागरीक गावाला भेट देत असत. या वर्षीही अनेकांनी मूर्तींची ऑर्डर दिली होती. परंतु कोरोनाचा वाढता प्रसार पाहता सार्वजनिक उत्सवाला मर्यादा आल्या आहेत. ज्यांच्यासाठी हौस करायची ते दर्शकच येणार नसतील तर अवाढव्य खर्च करुन काय उपयोग असा प्रश्‍न गणेशभक्तांना पडला आहे. त्यातच खबरदारी म्हणून ग्रामपंचायतीनेही बाहेरच्या गणेश भक्तांना गावात प्रवेश बंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्थानिक गणेशभक्तांबरोबरच दर्शकांचीही नाराजी झाली आहे. 

कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्‍यता
गावात गर्दी झाल्यास कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्‍यता होती. त्यामुळेच या वर्षी बाहेरील गणेशभक्तांना गावात प्रवेशबंदीचा निर्णय घेतला आहे. गणेशभक्तांनी ही बाब समजून घ्यावी.
- रामभाऊ पारसे, सचपंच, सातवणे

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT