The pivotal role played by retired soldiers in the coronation kolhapur marathi news 
कोल्हापूर

....तर कोरोनालढ्यात निवृत्त सैनिक बजावतील महत्वपूर्ण भूमिका...

महादेव वाघमोडे

उजळाईवाडी (कोल्हापूर) :कोरोना विरुद्धच्या लढ्यात डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ पोलीस व आर्मीचे जवान भूमिका बजावत आहेत. परंतु हे सर्वजण मोठ्या शहरात आपली कर्तव्य पार पाडत असून लहान शहरे व ग्रामीण भागामध्ये अजूनही पोलीस व जवान तैनात करण्यात आले नसून त्यामुळे अशा ठिकाणचे लोक घरात न थांबता बाहेर गर्दी करत आहेत . अशावेळी कोरोना चा संसर्ग वाढण्याची भीती आहे.

दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना ग्रस्तांच्या संख्येमुळे यापुढील काळात शहरात आणि ग्रामीण भागांमध्ये यापुढील काळात कोरोना संदर्भातील कामासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षित व अनुभवी मनुष्यबळाची आवश्यकता आहे . तात्पुरता उपाय म्हणून प्रशासनाने ग्राम समित्यांची नेमणूक केली असली तरीही  प्रशिक्षणाचा व अनुभवाचा अभाव असल्याने व काही अंशी राजकीय पक्षपाती वागणुकीच्या आरोपांमुळे ग्राम समितीचे काम तितकेसे परिणामकारक होत नाही.

यावेळी गावातीलच किंवा गावात शेजारी राहणाऱ्या सैन्यातील निवृत्त अधिकारी व जवानांची मदत घेतल्यास लॉक डाऊन व संचार बंदीच्या नियमांचे काटेकोर पालन होण्यास मदत होईल. तसेच  अशा आणीबाणीच्या प्रसंगी परिस्थिती कशी हाताळावी याचे शिस्तबद्ध , पद्धतशीर प्रक्रियेचे ज्ञान व अनुभव यांनी हे जवान समृद्ध असतात. त्यामुळे अशावेळी निवृत्त लष्करी जवान महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. तसेच या जवानांना कोरोना संशयित व कोरोना ग्रस्त रुग्ण यांना हाताळताना लष्करी शिस्तीचा अनुभव कामी येऊ शकतो.

लढाई ,आपत्ती व महामारी च्या काळात सुरुवातीच्या  व अंतिम काळातील रणनीती अत्यंत महत्त्वाची असून यासंबंधी सर्वोत्कृष्ट भूमिका आमचे निवृत्त सैनिक बजावू शकतात. त्यामुळे शासनाने यांच्या अनुभवाचा योग्य उपयोग करून घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर निवृत्त सैनिकांनी ही अशा कठीण समयी देश सेवेसाठी  पुढे यावे.
कर्नल अमरसिंह सावंत,निवृत्त सेनाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Recruitment: बीडमध्ये ७८१ पदांसाठी भरती! कोणती पदं भरली जाणार? शैक्षणिक पात्रता काय? वाचा सविस्तर...

Rohit Pawar : "भाजप निवडणूक हरेल म्हणून मुरलीधर मोहोळ घाबरले आहेत" - रोहित पवार

Elephant Viral Video: अरे बापरे! हत्तीची ही शक्ती पाहून डोळे फुटतील! काही क्षणातच उचलली भारी ट्रॉली, जणू खेळणीच! व्हिडिओ व्हायरल

Mumbai News: नव्या वर्षापासून रुग्णालयात जेवण बंद, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांची अडचण; कारण काय?

Accident News: दुर्दैवी! काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलीसह तीन जणांचा मृत्यू; घटनेनं हळहळ, काय घडलं?

SCROLL FOR NEXT