कोल्हापूर

Raju Shetti Parikrama - पंचगंगेचे लोखंडी कठडे दोराने केले बंदिस्त

जितेंद्र अनुजे

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रोश पूरग्रस्तांची पंचगंगेची परिक्रमा सुरु आहे.

नृसिंहवाडी : माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पदयात्रेतून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नृसिंहवाडीतील पंचगंगा नदीवरील पुलाला दोन्ही बाजुचे लोखंडी कठडे 'दोर'च्या सहाय्याने बंदिस्त केले आहेत. (Raju Shetti Parikrama) महापूरामुळे नुकसानग्रस्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात्मक पदयात्रेची सांगता आज सायंकाळी श्री. क्षेत्र नृसिंहवाडी येथे होणार आहे. यावेळी हजारोंच्या संख्येने जलसमाधीने होणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सूचित केले आहे. (Kolhapur News)

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पंचगंगेची परिक्रमा सुरु आहे. दरम्यान पोलिस प्रमुखांच्या उपस्थितीत पूलाजवळ बंदोबस्तासाठी असलेले 100 हून अधिक पोलिसांनी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुलाचे लोखंडी कठडे दोरीच्या साह्याने बंदिस्त केले आहेत.

या परिसरात ठिकठिकाणी पाचशेहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त असल्याने बसस्थानक परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कुरुंदवाड शिवाजी पुतळा, पंचगंगा पूल, नृसिंहवाडी स्वागत कमानीजवळ तसेच मंदिर परिसरात लोखंडी बॅरिकेट्स लावून मार्ग बंद केले आहेत. दत्त मंदिर मार्गावरील सर्व दुकाने आज दुपारी बंद करण्यात आली आहेत. माजी खासदार राजू शेट्टी व शेकडो कार्यकर्ते जलसमाधी ठिकाणाकडे म्हणजे कृष्णा-पंचगंगा संगम घाटाकडे जाणारे सर्व मार्ग पोलिस यंत्रणेकडून बंद केले आहेत. पोलिस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली गेली आहे. कृष्णा-पंचगंगा नदीपात्रामध्ये राजू शेट्टी यांच्या जलसमाधी प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाच्या वतीने बोटी व मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आले आहे.

आज दुपारी तीन वाजता राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची सांगता श्री. क्षेत्र नृसिंहवाडी या परिसरात होईल. यासाठी व्यासपीठ उभारण्यात आले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत माजी खासदार राजू शेट्टी पूरग्रस्तांच्या या आंदोलनाच्या माध्यमातून सभेत मनोगत व्यक्त करणार आहेत. यासाठी महिलांनीही उपस्थित लावली असून सभेनंतर राजू शेट्टींसह शेकडो शेतकरी जलसमाधी घेण्यासाठी गेल्यास त्यांच्या अटकेचे संकेत मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT