shridhar shingate
shridhar shingate 
कोल्हापूर

त्याने ठोकली धूम पण आता 210 पोलिस त्याच्या मागावर....

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज - येथील प्रथमवर्ग न्यायालयातून पलायन केलेला मोका गुन्ह्यातील आरोपी श्रीधर अर्जुन शिंगटे याच्या तपासासाठी त्याच्या साथीदारांना पोलिसांनी टार्गेट केले असून आज दिवसभरात सुमारे पंधराहून अधिक साथीदारांची कसून चौकशी केली. यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, तिरुपती काकडे, पोलिस उपअधीक्षक अंगद जाधवर, श्री. अमृतकर दिवसभर येथे तळ ठोकून होते. दरम्यान, पाच ते सहा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात ठेवल्याचेही सांगण्यात आले.

मोस्ट वाँटेड शिंगटे याला गेल्या वर्षी मार्चमध्ये अटक केली. तो सध्या कळंबा जेलमध्ये होता. उद्योजक रमेश रेडेकर यांना धमकी देऊन एक कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी त्याच्याविरोधात आजरा पोलिसात गुन्हा दाखल आहे. त्याच गुन्ह्यातील सुनावणीसाठी त्याला येथील प्रथवमर्ग न्यायालयात बुधवारी (ता. ४) आणले होते. दरम्यान, नाष्टा करण्यासाठी गेलेल्या कोर्ट कॅन्टीनमधूनच तो पोलिसाला धक्का देऊन पसार झाला. बुधवारी दिवसभर आणि रात्रीही कर्नाटक, गोव्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी केली. तालुक्‍यातील विविध गावात असलेल्या त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला. परंतु तो आज रात्री उशिरापर्यंतही सापडलेला नाही.

दरम्यान, बुधवारी रात्री बेळगुंदी, अत्याळ, ऐनापूर, इंचनाळ आदी गावात जाऊन त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले. पंधराहून अधिक साथीदारांना आज दिवसभर पोलिस ठाण्यात जमविले होते. हे सर्व साथीदार पंचवीशीतील आहेत. त्यांच्या चौकशीसाठी स्वत: पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त अधीक्षक श्रीनिवास घाडगे, तिरुपती काकडे, पोलिस उपअधीक्षक अंगद जाधवर, श्री. अमृतकर पोलिस ठाण्यात तळ ठोकून होते. एकेकाला बोलावून कसून चौकशी सुरू होती. यामध्ये काहींनी शिंगटेच्या पळून जाण्याला मदत केल्याचे निष्पन्न झाल्याचे समजते. अशा युवकांना चौकशीसाठी ताब्यात ठेवल्याचे समजते.

आज दिवसभर पोलिस ठाण्यात शिंगटे प्रकरणी चौकशी सत्र सुरू होते. इतर कामानिमित्त येणाऱ्यांना काही वेळाने या, अशी उत्तरे मिळत होती. दिवसभर ठाण्याच्या आवारात काही युवकांच्या पालकांनीही गर्दी केली होती. बंद केबीनमध्ये चौकशी सत्र सुरू असल्याने माहिती बाहेर येत नव्हती. पुढे या युवकांचे काय होणार, या चिंतेने पालक भांबावून गेले होते. 
महत्त्वाचे धागेदोरे हाती आज साथीदारांच्या चौकशीत महत्त्‍वाचे धागेदोरे हाताला लागल्याचे समजते. तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड म्हणाले, ‘‘स्वत: पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकारी याच कामात गुंतले आहेत. तपासासाठी विविध ठिकाणी पथके रवाना केली आहेत.

 तिब्बल सीट ऐनापूर फाट्यापर्यंत गेल्याची चर्चा

शिंगटेला पळून जाण्यासाठी मदत केलेले पाच ते सहा संशयीत आहेत. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे पळून जाण्यासाठी वापरलेल्या मोटारसायकलची माहितीही हाती लागली असून लवकरच शिंगटेला पकडू.’’ पलायनानंतर शिंगटे तालुक्‍यातच मोकासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी शिंगटे पलायन केल्यानंतर तो कर्नाटक किंवा गोव्या राज्यात जाण्याच्या शक्‍यतेने त्यादिशेनेच पोलिसांनी नाकाबंदी व उपाययोजना केल्या; परंतु पलायनानंतर दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास तालुक्‍यातील बेळगुंदी, अत्याळ फाट्यासह विविध ठिकाणी येऊन गेल्याचेही समजते. अत्याळ फाट्यावर तो अर्धा तास होता अशी चर्चा आहे. तेथूनच तो एका साथीदाराच्या मोटारसायकलवरून तिब्बल सीट ऐनापूर फाट्यापर्यंत गेल्याची चर्चा त्याचे फुटेज सापडल्याचीही चर्चा आहे.

कॉम्बिग ऑपरेशन

दरम्यान, शिंगटे काल ऐनापूर येथून गायब झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी आज रात्री उशिरा गडहिंग्लज-आजरा रोडवरील प्रत्येक गावात जाणाऱ्या रोडवर कॉम्बिग ऑपरेशन सुरू केले होते. नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात होती. याच मार्गावर शिंगटेचे इंचनाळ हे गाव आहे.

अधिकाऱ्यांसह २१० पोलिस

शिंगटेच्या शोधासाठी १६ निरीक्षकांसह सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि २१० पोलिस कर्मचाऱ्यांची कुमक आहे. आज रात्रीपर्यंत बाहेरून कर्मचारी ठाण्यात दाखल होत होते. सायबरसह गुन्हे अन्वेषणचे पथकही तैनात होते. रात्रीच या सर्वांना एकत्र करून शिंगटेच्या शोधकार्याचा ॲक्‍शन प्लॅन करून पथके रवाना करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येते.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT