Police Mock Drill at Kolhapur Railway Station esakal
कोल्हापूर

कोल्हापूर रेल्वे स्थानकात 'बॉम्ब'; संपूर्ण यंत्रणा हादरली; पोलिसांनी 'ती' बॅग बाहेर आणली अन् बॉम्ब..

अर्धातास चाललेल्या धावपळीमुळे स्थानकातील प्रवासी, कर्मचारी चांगलेच घाबरले

सकाळ डिजिटल टीम

अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत शहरातील सर्व पोलिस ठाण्यांचे कर्मचारी, अधिकारी रेल्वे स्थानकात आले. त्यानंतर पोलिसांचे श्वान रेल्वे स्थानकात नेण्यात आले. या श्वानांनी संपूर्ण स्थानकात शोध घेतला.

कोल्हापूर : रेल्वे स्थानकातील (Kolhapur Railway Station) काल दुपारी ४ ची वेळ. अचानक पोलिस (Police) गाड्यांचा ताफा स्थानकाच्या आवारात आला. पाठोपाठ अग्निशमन यंत्रणेचा बंब, बॉम्ब शोधपथक दाखल झाले. पोलिसांचे श्वान पथक रेल्वे स्थानकात गेले. तिकीट खिडकीजवळ घुटमळले.

तेथे एक बेवारस बॅग मिळाली. तातडीने ती बॅग बाहेर आणून त्यातील साहित्य बाहेर काढले आणि आत असणारा बॉम्ब (Bomb) निकामी केला. हे पोलिसांचे मॉक ड्रिल होते. बॉम्बही खोटा होता, मात्र सुमारे अर्धातास चाललेल्या धावपळीमुळे स्थानकातील प्रवासी, कर्मचारी चांगलेच घाबरले.

मॉक ड्रिल असल्याचे लक्षात आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही मॉक ड्रील घेण्यात आली. दुपारी ३.४५ च्या सुमारास सर्व पोलिस ठाणी, महापालिका, अग्निशमन यंत्रणा, श्वान पथक आणि रेल्वे प्रशासन यांना फोन करून रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याचे सांगण्यात आले.

त्यानंतर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत शहरातील सर्व पोलिस ठाण्यांचे कर्मचारी, अधिकारी रेल्वे स्थानकात आले. त्यानंतर पोलिसांचे श्वान रेल्वे स्थानकात नेण्यात आले. या श्वानांनी संपूर्ण स्थानकात शोध घेतला. यावेळी तिकीट खिडकी आणि रेल्वे स्थानकात दोन बेवारस बॅग मिळून आल्या.

त्यामध्ये कपडे आणि त्याच्या खाली खोटे बॉम्ब ठेवण्यात आले होते. बॉम्ब शोध पथकाने ते निकामी केले. रेल्वे स्थानकात रुग्णवाहिका, अग्निशमनचे बंब उभा करण्यात आले होते. यावेळी अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, पोलिस उपअधीक्षक अजित टिके, पोलिस निरीक्षक सतीशकुमार गुरव, अनिल तनपुरे, अजयकुमार सिंदकर, महादेव वाघमोडे यांच्यासह तिन्ही पोलिस ठाण्यांमधील कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

बॉम्ब शोधपथकाची तारांबळ

मॉक ड्रिलमध्ये बॉम्ब शोध पथकाला घटनास्थळी पोहण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त अवधी लागला. त्यांच्याकडे मनुष्यबळ आणि साधनांची कमतरता होती. तसेच अशावेळी सिमेंट, वाळूची पोती आवश्यक असतात ती त्यांच्याकडे नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : भारताच्या मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT