Possible Sanctuary For Bears In Chandgad Taluka Kolhapur Marathi News
Possible Sanctuary For Bears In Chandgad Taluka Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

चंदगडच्या पश्‍चिम भागात अस्वलांसाठी अभयारण्य शक्‍य

सुनील कोंडुसकर

चंदगड : तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात इसापूरपासून कानूरच्या पट्ट्यात अस्वलांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. जीव साखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या या प्राण्याचे अस्तित्व टिकवणे गरजेचे आहे. त्यासाठी या विभागात अस्वलांसाठी अभयारण्य झाल्यास त्यांच्या अस्तित्वासह शेतकऱ्यांनाही नुकसानीची योग्य भरपाई मिळेल. पर्यटकांमुळे स्थानिक रोजगार वाढेल तसेच निसर्गप्रेमींना अस्वलांविषयी अभ्यास करण्यास मुभा मिळेल. 

कोकणातील चौकुळ हद्दीपासून तालुक्‍यातील इसापूर, जांबरे, उमगाव, कोकरे, अडुरे, पिळणी, भोगोली, सडेगुडवळे, कानूर, पुंद्रा या पट्ट्यांत अस्वलांचा वावर आहे. घनदाट जंगलात राहणारी अस्वले अनेकदा खासगी मालकीतही येतात. एप्रिल, मेच्या सुमारास काजूची फळे खाण्यासाठी शेतीत उतरतात. अस्वलांची वैशिष्ट्ये माहीत असल्याने शेताकडे राखण करण्यासाठी जाणारे शेतकरी हातात पलोता घेऊनच वावरतात. 

गेल्या तीन महिन्यांत तालुक्‍यात विविध ठिकाणी अस्वलांकडून मानवांवर हल्ला होण्याच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वीही त्या घटना घडत असत; परंतु प्रमाण तुरळक होते. गेल्या आठवड्यात आडुरे-कोकरेच्या हद्दीत एक अस्वल शेतातील घरात घुसले. जखमी असल्यामुळे ते हिंसक बनले होते. वन्यजीव संरक्षण दलाकडून त्याची सुरक्षित सुटका करण्यात आली. त्याच्यावर उपचार करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

या निमित्ताने अस्वलांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न स्पष्टपणे पुढे आला. त्यासाठी अभयारण्य हा प्रस्ताव सुरक्षित मानला जातो. अभयारण्य घोषित केल्यास जंगल आणि प्राण्यांची सुरक्षितता वाढेल. शेत जमिनीत नुकसान झाल्यास त्वरित आणि योग्य दराने भरपाई मिळेल. शिवाय पर्यटकांचा ओघ वाढल्याने स्थानिक रोजगाराला चालना मिळेल. सद्यस्थितीत वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान केले जात असताना त्याच्या भरपाईचे प्रबळ स्त्रोत नाहीत. ते पर्यटनाच्या माध्यमातून मिळतील. 

अस्वलाची वैशिष्ट्ये 
- आयुर्मान ः सरासरी 40 वर्षे. 
- उंची ः 60 ते 90 सेंटिमीटर. 
- वजन ः 50 ते 140 किलो. 
- मुख्य खाद्य ः मुंग्या, कीटक, वाळवी, मधाची पोळी. 
- पर्यायी खाद्य ः वनस्पतींची पाने, फळे. 
- अन्य वैशिष्ट्य ः मादी 
नरापेक्षा लहान असते; पण अंगावर केस जास्त असतात. 

जंगल आणि प्राण्यांचेही संरक्षण होईल
दुर्ग आणि गड भ्रमंतीच्या निमित्ताने 35 वर्षांहून अधिक काळ माझा चंदगडशी संपर्क आहे. तेव्हापासून मी इसापूर, चौकुळ परिसरांत अस्वले पाहत आलो आहे. जांबरेलगतचे जंगल हे नैसर्गिकदृष्ट्या संपन्न आहे. हा परिसर अस्वलांच्या अस्तित्वासाठी सुरक्षित आहे. अभयारण्य झाल्यास जंगल आणि प्राण्यांचेही संरक्षण होईल. 
- डॉ. अमर अडके, निसर्ग आणि दुर्ग अभ्यासक, कोल्हापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''सुनीतासारखी बायको मिळाल्याबद्दल देवाचे आभार मानतो, माझ्यासारख्या...'' अरविंद केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

Shikhar Dhawan Retirement: क्रिकेटला करणार गुडबाय? दुखापतीवर अपडेट देत शिखर धवन स्पष्टच बोलला...

Aishwarya Narkar: "हे तुम्हाला शोभतं का? असं म्हणू नका!"; ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकरचं सडेतोड उत्तर

Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवालसह इतरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनाचा अर्ज मोकळा

Latest Marathi News Live Update : पुणे कार अपघात प्रकरणी आरोपींचा जामिनासाठी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT