कोल्हापूर - दुचाकीवरून डबलसीट निघाला तर 2200 रुपये दंड केला जाईल. कलम 188 नुसार ही कारवाई करण्यात येणार असल्याचे एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. कोल्हापूर आरटीओ कार्यालयाकडून ही माहिती प्रसिद्ध केल्याचे संदर्भ या पोस्टवर आहेत, प्रत्यक्षात हे पोस्टर "फेक" आहे, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) यांनी असे कोणतेही पोस्टर प्रसिद्धीस दिलेले नाही किंबहुना त्याबाबतचे आदेश काढलेले नाहीत.
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी 188 कलम लागू आहे. बंद असलेल्या आस्थापना सुरू केल्यास या कलमाद्वारे कारवाई केली जाऊ शकते, तसेच याच 188 कलमानुसार नियमभंग करणाऱ्या वर सुद्धा कारवाई केली जाऊ शकते, असे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात दुचाकीवरून एकाच व्यक्तीला जाण्यास परवानगी आहे, मात्र सध्या दुचाकीवरून डबलशीट जाणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांकडून सध्या गुन्हे दाखल केले जात नाहीत. तसेच सोशल मीडियावर फिरत असलेली संबंधित पोस्ट- पोस्टर याच्याशी पोलीस दलाचा कोणताही संबंध नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सकाळ'शी बोलताना सांगितले.
दुचाकीवरून सध्या डबलसीट जाणाऱ्या वाहनधारकांना बावीसशे रुपये दंड असे कोणतेही नोटिफिकेशन कोल्हापूर आरटीओकडून काढलेले नाही, आरटीओच्या नावे ही पोस्ट कोणी वायरल केली याचा सायबर शाखेकडून तपास केला जाईल.
डॉ. स्टीव्हन अल्वारिस - आरटीओ, कोल्हापूर
दुचाकीवरून डबलसीट जाणाऱ्यांना बावीसशे रुपये दंड ही सोशल मीडिया वरील पोस्ट चुकीची आहे, पोलिस वेगवेगळ्या कायद्यानुसार कारवाई करू शकता, मात्र 2200 रुपये दंडाची पोस्ट चुकीची आहे, सध्या पोलीस दुचाकीवर डबल जाणाऱ्या वर गुन्हा दाखल करीत नाहीत, मात्र नागरिकांनी स्वतःहून दुचाकीवरून एकटेच जावे,
डॉ. अभिनव देशमुख - पोलीस अधीक्षक,कोल्हापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.