pots of secret treasure found in anuskura Kolhapur  
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात 'या' ठिकाणी सापडले गुप्त धनाचे मडके...

सकाळवृत्तसेवा

करंजफेण (कोल्हापूर) - अनुस्कुरा (ता. शाहूवाडी) येथे जमिनीचे सपाटीकरण करत असताना शेतजमीनीत गुप्त धनाचे मडके सापडले. त्यात 715 नाणी मिळून आली असून ती शासकीय मुल्यांकनासाठी शाहूवाडी तहसील विभागाने ताब्यात घेतली आहेत.

शाहूवाडी तालुक्‍यातील अनुस्कुरा येथील विनायक पाटील यांच्या शेतजमीनीचे सपाटीकरणाचे काम सुरू होते. बुधवारी (ता.27) रात्री पोकलेन मशिनच्या धक्‍याने मातीत असलेले एक मडके फुटले. त्यातील गुप्तधनाची नाणी विखुरली. याची माहिती तहसिल विभाग व शाहूवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले यांना दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संबधित 715 नाणी व मडक्‍याचे तुकडे पंचाच्या उपस्थितीत ताब्यात घेतले. त्यानंतर ते सिल करून मुल्यांकनासाठी पाठवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT-Sawantwadi Express : स्वच्छतागृहात सांडपाणी अन् फुटलेल्या काचांवर पुठ्ठे; सावंतवाडी एक्स्प्रेसच्या पहिल्याच प्रवासातील दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल, ट्रेनमधील धक्कादायक वास्तव समोर

Parbhani food Safety Raid: परभणीत अन्न सुरक्षा विभागाचा छापा; पेढीचा परवाना निलंबित, २१५ किलो मिल्क पावडर जप्त

Marathi News Live Updates : कमीत कमी प्रदूषण अन् शक्य तितक्या पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करू : मुख्यमंत्री फडणवीस

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

SCROLL FOR NEXT