कोल्हापूर

वादळानं सारं हिरावून नेलं; तरुणाचे पोल्ट्री फार्म उध्वस्त

राजेश मोरे

कोल्हापूर : नोकरी नाही तर व्यवसायच करायचा, त्यात यशस्वी (business run successfully) व्हायचं. या आत्मविश्वासाने (confidenace) मंगळवार पेठेतील 'सचिन' यांनी पोल्ट्री फार्म (poultry business) सुरु केला. महापूर, बर्ड फ्लू पाठोपाठ कोरोना संकट उभा राहीलं. त्याचा मुकाबलाही त्यांनी केला. पण आता वादळी पावसाने त्याचं सारच हिरावून नेले.

मंगळवार पेठ (kolhapur mangalwar peth) मंडलीक गल्लीतील सचिन सदाशिव पवार हे आई, लहान भावासोबत राहतात. पितृछत्र लवकर हरपल्याने कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या पडली. १५ वर्षे मेडिकलमध्ये नोकरी करत त्यांनी जबाबदाऱ्या पेलल्या. स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यांनी व्यवसाय करण्याचे ठरवले. त्यांनी वसगडे (ता. करवीर) येथील शिवराज मलकाने यांची जागा भाडेतत्त्वावर घेऊन तीन ते साडेतीन वर्षांपूर्वी पोल्ट्री फार्म सुरू केला. त्यांनी भाडेपट्टीसह लाखोंचे भांडवल नातेवाईक मित्रांकडून हात उसणे आणि कर्ज काढून उभा केले.

व्यवसाय सुरू झाला. तेवढ्यात महापुराचे संकट आले. त्यापाठोपाठ बर्ड फ्लू आणि कोरोना संकट समोर उभा राहीले. सचिन यांनी या संकटाचा मुकाबला करत व्यवसायाची घडी बसवण्यास सुरुवात केली. पण स्वप्नातही नव्हतं असं घडलं. दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार वादळी पावसात त्यांचा फार्मच जमीनदोस्त झाला. यात सुमारे तीन एक हजाराहून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला. सचिन यांनी मित्र नातेवाईकांसोबत जेवढे पक्षी वाचवता येतील तेवढे त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे लाखोंचे नुकसान झाले. पुन्हा पोल्ट्री कशी उभा करायची? हात उसने आणि कर्जाचे पैसे कसे भागवायचे? असे प्रश्न त्यांच्यासमोर उभे आहेत. शासन पातळीवर जमीनदोस्त झालेल्या पोल्ट्रीची पाहणी व पंचनामा केला आहे. शासनाकडून किती नुकसान भरपाई मिळणार याकडे सचिन यांचे डोळे लागून आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT