Power engineer commits suicide in Satara district 
कोल्हापूर

आई-वडिलांशी शेवटच बोलून गारगोटीच्या वीज अभियंत्याने केली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

कोरेगाव (कोल्हापूर) : महावितरणच्या किन्हई (ता. कोरेगाव) येथील शाखा कार्यालयात अभियंत्याने गळफास घेतल्याचे आज सकाळी निदर्शनास आल्याने खळबळ उडाली. या घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सूरज सुधीर देसाई (वय २५, मूळ रा. सोनाळी, ता. गारगोटी, सध्या रा. एकंबे रोड, कोरेगाव)

याबाबत ग्रामस्थांकडून मिळालेली माहिती अशी 

पेठ किन्हई येथे महावितरण कंपनीचे शाखा कार्यालय आहे. तेथे सूरज देसाई चार-पाच महिन्यांपूर्वी कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाले होते. दरम्यान, आज सकाळी आठच्या सुमारास शाखा कार्यालयामध्ये सूरज गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळून आले. माहिती कळवल्यानंतर सातारारोड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. कोरेगाव पोलिस ठाण्याच्या प्रभारी आयपीएस अधिकारी रितू खोखर देखील तेथे पोचल्या. दरम्यान, या घटनेची माहिती सूरज यांच्या नातेवाईकांना कळवण्यात आली. दुपारी नातेवाईक आल्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. 
दरम्यान, रविवार असूनही एवढ्या सकाळी शाखा कार्यालयात सूरज गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळून आले. ही घटना शनिवारी रात्री घडली, की आज सकाळी घडली आणि या घटनेमागचे नेमके कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

शेवटचा संवाद आई-वडिलांशी 
गारगोटी सोनाळीतील सूरज देसाई महावितरणमध्ये दीड वर्षापासून कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते. शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान त्यांचे आई-वडिलांशी दूरध्वनीवरून शेवटचे बोलणे झाले होते. वडिलांनी रात्री नऊपासून अकरापर्यंत पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण संपर्क झाला नाही. सूरज यांच्या मागे आई-वडील व विवाहित बहीण आहे. वडील शेतकरी आहेत. दरम्यान, सूरज यांच्या मृतदेहावर गारगोटीत रविवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

खिशात सापडली चिठ्ठी
सूरज यांच्या खिशात चिठ्ठी सापडली; मात्र त्यातील तपशिलाबाबतची माहिती समजू शकली नसल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे; परंतु त्याबाबतची अधिकृत माहिती पुढे आली नाही.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: सत्तेचा काटा फिरवणार! काँग्रेस–वंचितची आघाडी कुणाचं गणित बिघडवणार? मुंबईची राजकीय सत्तासमीकरणं हादरली

Daulatabad News : वेरूळ, देवगिरी परिसर ‘हाउसफुल्ल’; घाटात वाहनांच्या रांगा; सलग सुट्यांचा परिणाम

Vastu Shastra: आठवड्याच्या 'या' दिवसांत पैशाचे व्यवहार करू नका, वास्तुशास्त्रात सांगितले महत्त्वाचे नियम

Horoscope : 2026 वर्ष सुरू होताच बनतोय लक्ष्मी-कुबेर धनलाभ योग; 6 राशींच्या लोकांना मिळणार भरपूर पैसा, अडकलेली कामे होणार पूर्ण

Latest Marathi News Live Update : तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला घटस्थापनेने विधिवत प्रारंभ

SCROLL FOR NEXT