kolhapur esakal
कोल्हापूर

प्रतिपंढरपूर नंदवाळमध्ये रिंगण सोहळ्यावरून वाद

रिंगण सोहळा करू देत नसल्याने ग्रामस्थ आणि परिसरातील भाविक संतप्त झाले

सकाळ डिजिटल टीम

रिंगण सोहळा करू देत नसल्याने ग्रामस्थ आणि परिसरातील भाविक संतप्त झाले

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर (Pratipandharpur) समजल्या जाणाऱ्या नंदवाळ येथील रिंगण सोहळ्याचा वाद चिघळला आहे. यावेळी पोलिस आणि वारकऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. आरक्षित जागेवर रिंगण सोहळा करण्यावर हा वाद झाला आहे. येथील आरक्षित केलेली मूळ जागा ही नंदवाळचे (Nandawal) गायरान आहे. गावचा विरोध असतानाही शासनाने ही जागा बटालियनला दिली आहे. त्यामुळे त्या जागेवर आम्हाला रिंगण सोहळा करू देत नसल्याने ग्रामस्थ आणि परिसरातील भाविक संतप्त झाले आहेत. (pratipandharpur nandwal ringan sohala)

दरम्यान, भारत बटालियनच्या आरक्षित जागेवर रिंगण सोहळा करण्यावर वारकरी आणि ग्रामस्थ ठाम असून या रिंगण सोहळ्याला भारत बटालियनच्या पोलिसांनी (Police) विरोध केल्याने हा वाद आणखी चिघळला आहे. आज हरिनाम सप्ताह निमित्त रिंगण सोहळ्याचे नियोजन हे गावकऱ्यांनी केलं होतं. मात्र भारत बटालीयनच्या पोलिसांनी याला विरोध केल्यामुळे पोलिस आणि वारकरी हे आमने-सामने आल्याने धक्काबुक्की झाली आहे. दरम्यान सध्या या गावात तणावाची परिस्थिती कायम असून मोठा पोलिस फौजफाटा दाखल झाला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Special: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांना मध्य रेल्वेची मोठी भेट; सीएसएमटी, एलटीटी, पुणे व दिवाहून तब्बल २४६ गणपती विशेष गाड्या

Warana Dam Water Release VIDEO : सांगलीकरांनो सावधान! वारणा धरणाचे 4 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; 3,400 क्युसेकने विसर्ग सुरू

Mumbai News: मुंबईच्या वस्त्यांमध्ये वाढते मजले, कमी होते सुरक्षिततेचे भान; दुर्घटनांचा धोका कायम

Shirur Protest: अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी शिरूर नगरपरिषदेसमोर लहूजी शक्ती सेनेचे बेमुदत उपोषण, दोन दिवसांत निर्णय न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा

ZP Budget Boost: पुणे जिल्हा परिषदेचे ३३३ कोटींचे पुरवणी अंदाजपत्रक मंजूर; कृषी, शिक्षण, आरोग्य व महिला-बालकल्याण विभागांना भरीव तरतूद

SCROLL FOR NEXT