Prayers were the beginning of work  
कोल्हापूर

प्रार्थनेने होते जिल्हाधिकारी कार्यालयात कामकाजाची सुरूवात 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : "इतनी शक्ती हमे देना दाता, मन का विश्‍वास कमजोर हो ना,' या प्रार्थनेने जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज सुरू होत आहे. रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी यांनी हा उपक्रम राबवला आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 10.15 ला सर्व अधिकारी आणि कर्मचारी परिघाप्रमाणे उभे राहतात. सर्वांचे हात जोडले जातात. लॅपटॉपवरील प्रार्थनेबरोबर खड्या आवाजातही इतनी शक्ती हमे देना दाता मन का विश्वास कमजोर हो ना, प्रार्थनेला सुरूवात होते. प्रार्थनेनंतर ध्यानधारणा ओमकार स्वराने आणि हितगुजाने शेवट होतो. 

गेल्या दोन महिन्यांपासून या कार्यालयात ताण-तणाव मुक्त राहण्यासाठी "हितगुज' हा उपक्रम राबविला जातो. यामध्ये जिल्ह्यातील एखादा अधिकारी हितगुजासाठी बोलविला जातो. बालपणापासून हरवत गेलेले हितगुज या निमित्ताने होत जाते. या हितगुजामधून एक नवी ऊर्जा मिळून जाते. त्यामुळे मनाला उभारी तर मिळतेच शिवाय प्रसन्न मनाने कार्यक्षमता वाढते. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह उपजिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, हेमंत निकम, दत्तात्रय कवितके, उपसंचालक भाग्यश्री फरांदे, खनिकर्म अधिकारी अमोल थोरात, तहसिलदार शिल्पा ठोकडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, लेखाधिकारी प्रशांत जाधव, डॉ. गोपाळ आयरोणी या हितगुजामुळे गेल्या दोन महिन्यात आमच्या स्वभावात सकारात्मक बदल झाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिवाजी पार्कसाठी ठाकरे बंधू अन् भाजप-शिंदेसेनेचाही अर्ज, एकच तारखा; कुणाला मिळणार परवानगी?

Crime News: काकाच्या हत्येचा बदला? नमाजानंतर चाकूहल्ला; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल ठार, जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट!

Latest Marathi News Live Update : राज्यात ढगाळ हवामान, किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता

भाविकांसाठी बातमी! विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शन तीन दिवस राहणार बंद; मूर्तीवर लवकरच हाेणार रासायनिक प्रक्रिया..

BJP–AIMIM Alliance: ‘बटेंगे तो कटेंगे’सारखे घोषवाक्य देणाऱ्या भाजपची AIMIM सोबत युती, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!

SCROLL FOR NEXT