Hasan Mushrif esakal
कोल्हापूर

Kolhapur : कोल्हापुरात मंत्री मुश्रीफांचं होणार जंगी स्वागत; कागलच्या सभेतून उद्या भूमिका करणार स्पष्ट

राज्यातील शिवसेना (Shiv Sena), भाजप सरकारमध्ये राष्‍ट्रवादी (NCP) सहभागी झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

सरकारमध्ये जिल्‍ह्यातील राष्‍ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना मंत्रीपदाची संधी मिळाली आहे.

कोल्‍हापूर : राज्यातील शिवसेना (Shiv Sena), भाजप सरकारमध्ये राष्‍ट्रवादी (NCP) सहभागी झाली आहे. या सरकारमध्ये जिल्‍ह्यातील राष्‍ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. मंत्री झाल्यानंतर मुश्रीफ हे शुक्रवारी (ता.७) पहिल्यांदाच जिल्‍ह्यात येत आहेत.

त्यांच्या स्‍वागताची जय्‍यत तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे. शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता मंत्री मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे ताराराणी चौकात आगमन होणार आहे. त्याठिकाणी जंगी स्‍वागत केले जाणार आहे. त्यानंतर रॅलीने ते दसरा चौकातील शाहू महाराज पुतळ्याला अभिवादन करणार आहेत.

तेथून राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेवून शिवाजी पुतळ्यास अभिवादन करुन बिंदू चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत. तेथून अंबाबाई मंदिरात दर्शन घेवून ही रॅली कागलला रवाना होणार आहे.

कागल येथे दुपारी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्री झाल्यानंतर मुश्रीफ पहिल्यांदाच जिल्‍हा दौऱ्या‍वर येत असल्याने ठिकठिकाणी स्‍वागत कमानी व होर्डिंग उभारली जाणार आहेत. मतदारसंघातील प्रत्येक गावात होर्डिंग लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल टप्प्याटप्प्याने 25 रुपयांपर्यंत महागण्याचा इशारा; आज किती आहे दर?

Kolhapur Amboli Highway Toll Free : कोल्हापूर -आंबोली राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी वाहनांना टोल माफ, तहसिलदारांची माहिती

KKR vs GT कोलकताचा आज पराभव झाला तर प्लेऑफचे स्वप्न संपणार? आज गुजरातविरुद्ध सामना, पाहा संभावित Playing XI

Monsoon In Andaman : मॉन्सूनचे अंदमानात आगमन; महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर कधी धडकणार तारीख आली समोर, प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; माणगाव, इंदापुरात वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT