Primary teacher transfer Teacher are being transferred online from the state level 
कोल्हापूर

लबाड लांडग ढोंग करतय, शिक्षक बदल्यावरून संघटनात सोशल वॉर... 

राजेंद्र पाटील

 कोल्हापूर :  प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याबाबत शिक्षक संघटनातच समन्वय नाही. श्रेयवादासाठी प्रत्येकाचे आपापले पद्धतीने राजकारण सुरू आहे. मी केले हे दाखविण्यासाठी नेतेमंडळींचा आटापिटा सुरू आहे.त्यातूनच लबाड लांडग ढोंग करतय, लांडगा कोण?ढाण्या वाघ कोण?, कोल्हेकुई सुरू आहे अशा पद्धतीच्या आरोप-प्रत्यारोपांचे सोशल वॉर प्राथमिक शिक्षक संघाच्या दोन गटात सुरू आहे.शिक्षकांच्या हितापासून शिक्षक संघटना दूर जात असल्याने सामान्य शिक्षकांत संताप व्यक्त केला जात आहे.संघटनेतील एकी अभावी यावर्षी शिक्षकांच्या बदल्या रखडण्याची चिन्हे आहेत.


गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या राज्यस्तरावरून ऑनलाईन पद्धतीने बदल्या होत आहेत.खो-खो पद्धतीच्या या बदल्यात दरवर्षी हजारो शिक्षकांच्या बदल्यांना सामोरे जावे लागले.ऑनलाइन प्रक्रियेत बदल्यांना टक्केवारीची मर्यादा नाही त्यामुळे सोयीची बदली हवी असणाऱ्यांची आणि बदली नको म्हणणाऱ्याचीही बदल्या होत आहेत. त्यामुळे बहुतांश शिक्षकांची बदली धोरणास विरोध आहे.अनेक शिक्षकांच्या गैरसोयी झाल्याने न्यायालयात याचिका दाखल झाल्या. माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने हे ऑनलाइन बदली धोरण अस्तित्वात आले.भाजप सत्तेच्या काळात शिक्षक संघटनांनी अधिवेशने, महामंडळ, सभा घेतल्या. ऑनलाईन बदली धोरणात बदल करण्याची मागणी केली परंतु प्रत्येक वेळी भाजपच्या मंत्र्यांनी आश्वासने दिली. मागण्यांना दाद दिली नाही.     


 राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर पुन्हा शिक्षक संघटना सक्रिय झाल्या. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नवीन बदली धोरण ठरविण्यासाठी बदली अभ्यास गट नेमला मात्र कोरोणामुळे निर्णय होऊ शकला नाही.इतर विभागाप्रमाणे पंधरा टक्के मर्यादेत शिक्षकांच्याही यावर्षी ऑफलाइन बदल्या करा असा प्रस्ताव पुढे आला.या बदल्या ऑनलाइन की ऑफलाइन करायच्या या  संघटनांच्या वादात सापडल्या.

.शिक्षकांच्या ज्या उदंड संघटना आहेत त्यांच्यात एकमत राहिलेले नाही.शिक्षकांच्या हितासाठी संघटना नेते एकत्र येऊन सर्वसमावेशक धोरण ठरवत नाहीत.मी केले या श्रेयवादासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करतो. प्रयत्नात एकवाक्यता,एकसंघठन नसल्याने ताकत लागत नाही. आणि त्यामुळे शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित राहत आहेत.यावर्षी शिक्षकांच्या सोयीच्या बदल्या करण्याचा प्रयत्न मंत्री मुश्रीफ यांचा होता.परंतु संघटनांच्या मागण्यात एकवाक्यता नसल्याने यावर्षी शिक्षकांच्या बदल्या होणे सध्यातरी फारच अवघड दिसते.

संघटनांचे नेते आपसात भांडत बसल्याने शिक्षकांचे प्रश्न सुटत नाहीत.खेकड्याची वृत्ती थांबवून सर्व संघटनांनी शिक्षकांचे हितासाठी,प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकत्र यावे.
धनाजी पाटील,  प्राथमिक शिक्षक

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT