In a private hospital in Kolhapur, the bills will be checked at the rate fixed by the government 
कोल्हापूर

कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे बिलांची होणार तपासणी

डॅनिअल काळे

कोल्हापूर : कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जादा दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या हॉस्पिटलच्या बिलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा अधिकारी दौलत देसाई यांनी एकवीस अधिकाऱ्यांची नियुक्ती यांनी केली. महापालिका पथकाबरोबरच प्रत्येक हॉस्पिटलच्या बिल तपासणीसाठी लेखाधिकारी व वरिष्ठ लेखाधिकारी यांची नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्यांकडून बिलाची तपासणी झाल्यानंतर रुग्णांकडून बिलाची रक्कम स्वीकारायची आहे. 
नियुक्त केलेले अधिकारी व त्यांची जबाबदारी अशी लेखाधिकारी रा. बा. नागणे (साई कार्डियाक सेंटर राजारामपुरी 6वी गल्ली व गंगा प्रकाश हॉस्पिटल रंकाळा स्टॅंड). लेखाधिकारी रुपाली रोकडे (मोरया हॉस्पिटल राजारामपुरी 9 वी गल्ली व सचिन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल राजारामपुरी 6 वी गल्ली). लेखाधिकारी प्रिया देशमुख (ऍपल सरस्वती हॉस्पिटल कदमवाडी, लेखाधिकारी संजय कुंभार यांच्याकडे केळवकर हॉस्पिटल ताराबाई पार्क व टुलीप हॉस्पिटल कदमवाडी). लेखाधिकारी वर्षा परीट (व्हिनस हॉस्पिटल नागाळा पार्क) कृषी अधिकारी स्वप्नील हिरुगडे (डायमंड सुपर स्पेशालिटी नागाळा पार्क व केपीसी हॉस्पिटल महाराणा प्रताप चौक). उपसंचालक रणजित झपाटी (अथायू हॉस्पिटल उजळाईवाडी). लेखापरीक्षण पथक अजित शिंदे (सिध्दी विनायक नर्सीग होम टाकाळा व व्यंकटेश हॉस्पिटल रविवार पेठ). लेखाधिकारी अस्मिता मोटे (अंतरंग हॉस्पिटल नागाळा पार्क), लेखाधिकारी अमृता कुंभार (सूर्या हॉस्पिटल दसरा चौक), लेखाधिकारी सुनील रेणके (मंगलमूर्ती हॉस्पिटल शास्त्रीनगर), लेखाधिकारी विभागीय संचालक कृषी विभाग जाधव ( कृष्णा हॉस्पिटल संभाजीनगर, लेखाधिकारी सुनील चव्हाण (मेट्रो हॉस्पिटल शाहूपुरी दुसरी गल्ली व अथयू हॉस्पिटल शाहुपूरी दुसरी गल्ली), लेखाधिकारी सागर वाळवेकर (पल्स हॉस्पिटल कदमवाडी व कोल्हापूर आर्थोपेडिक कदमवाडी), लेखाधिकारी बाबा जाधव (सनराईज हॉस्पिटल शिवाजी पार्क व स्वस्तिक हॉस्पिटल शिवाजी पार्क). लेखाधिकारी रवी पाटील (सिध्दी विनायक हार्ट हॉस्पिटल शास्त्रीनगर), लेखाधिकरी मिलिंद पाटील (नॉर्थ स्टार स्पेशालिटी हॉस्पिटल भक्ती पूजानगर व लाईफ लाईन हॉस्पिटल, भक्ती पूजानगर). लेखाधिकारी प्रशांत जाधव (कपीलोर हॉस्पिटल दुधाळी), दुर्गाली थोरात (अपेक्‍स हॉस्पिटल शिवाजी पार्क), वरिष्ठ लेखापरीक्षक शोभा घाटगे (जानकी नर्सिग होम राजारामपुरी 3 री गल्ली व सीटी हॉस्पिटल), वरिष्ठ लेखापरीक्षक दीपक कुंभार (ऍस्टर आधार हॉस्पिटल शास्त्रीनगर) अशी जबाबदारी आहे. 

संपादन ः यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: धुळे जिल्ह्यातील देशशिरवाडे येथे १.५ टन गोमांस जप्त

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT