kolhapur st  sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : एसटीचे खासगीकरण सुसाट

आठ सेवा केल्या खासगी; संपकाळात एसटीला १२०० कोटींचा तोटा

शिवाजी यादव -सकाळ वृत्तसेवा

आठ सेवा केल्या खासगी; संपकाळात एसटीला १२०० कोटींचा तोटा

कोल्हापूर : विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मिटलेला नाही, संपकाळात एसटीला(msrtc) १२०० कोटींचा तोटा झाला, तर यापूर्वीचा १४०० कोटींचा संचित तोटा आहेच. यातच एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिल्याने वर्षाला ६०० कोटींचा बोजा वाढणार आहे. अशा स्थितीत एसटी महामंडळ चालविणे मुश्कील बनले. संप ताणल्याची संधी साधून एसटीच्या चार सेवांचे खासगीकरण(Privatization) झाले. यापूर्वी आणखी सात सेवांचे खासगीकरण झाले. संप वाढत जाताना एसटीचे बस खासगीकरण सुसाट आहे.

संप ७४ दिवस सुरूच आहे, संपकाळात एसटी प्रशासनाने अभूतपूर्व वेतनवाढ दिली. परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, बडतर्फीची केलेली कारवाई मागे घेतो, असेही सांगितले, तरीही कर्मचारी मागणी व संपावर ठाम आहेत. यात प्रत्येक दिवशी लाखो प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटीचा रोजचा १२ ते १५ कोटींचा महसूल बुडतो.भविष्यात एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी पुरेसा महसूल मिळेल, की नाही, अशी शंका आहे. याचवेळी एसटीने पर्याय शोध सुरू केला, यात खासगी कंपन्यांकडून चालक नियुक्ती करणे, संपकाळात तीन हजारांवर खासगी वाहतूकदारांना खासगी वाहनातून एसटी बस स्थानकातून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली.

खासगी कंपन्यांचे(Private company drivers) चालक शिवशाही बस(shivshahi bus) चालविण्यासाठी घेतले. सेवानिवृत्तचालकांना पुन्हा चालक म्हणून सेवेत घेतले. राज्यभरात ५०० हून अधिक चालक भरले जाणार आहेत. आठ-दहा दिवसांत प्रक्रिया पूर्ण झाल्यास एसटीची मूळ सेवा असलेल्या प्रवासी वाहतुकीत २५ ते ३५ टक्के कर्मचारी खासगी सेवेचे असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Health Update : शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज ! चार दिवसाच्या विश्रांतीनंतर घरी परतणार

Latest Marathi News Live Update : नळदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी १४ कोटींचा विकास आराखडा

आई झाल्यावर पहिल्यांदाच दिसली कतरिना, चाहत्यांना बघत क्यूट स्माइल देत केलं असं काही की... VIRAL VIDEO

Stock Market Today : शेअर बाजाराची हिरव्या रंगात सुरुवात! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; IT शेअर्समध्ये वाढ; कोणते शेअर्स तेजीत?

Donald Trump : कोट्यवधी लोकांचा बळी गेला असता, भारत-पाक अणुयुद्ध मी थांबवले; ट्रम्प यांचा पुनरूच्चार

SCROLL FOR NEXT