production alphonso mango decreased by 50 percent Impact of climate change kolhapur sakal
कोल्हापूर

Alphonso Mango : ‘हापूस’चे उत्पादन ५० टक्क्यांनी घटले; वातावरण बदलाचा परिणाम

वातावरण बदलाचा परिणाम; दर अद्याप सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

संजय दाभाडे

कळंबा : ढगाळ वातावरण, उन्हाचा तडाका, अवकाळी पाऊस अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत हंगामात फळांचा राजा आंबा बाजारात आला. या वातावरणाचा हापूस आंब्यावरही मोठा परिणाम झाला असून, गतवर्षीपेक्षा चालू हंगामात ४० ते ५० टक्के आंबा उत्पादनात घट झाल्याचे दिसते. परिणामी, कोल्हापूरच्या बाजारात हापूस आंबा अजूनही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच राहिला आहे.

चालू हंगामात कोल्हापूरच्या बाजारपेठेत कोकणातून हापूस आंब्याची आवक कमी होत आहे. याच हापूस आब्यांची परदेशात मागणी वाढली असून, तीस हजारपेक्षा जास्त डझन हापूस आंबे निर्यातीचे उद्दिष्ट बागायतदारांनी ठेवले आहे. उपपदार्थ करण्यासाठी संबंधित कंपनींकडून दरही चांगला मिळत असल्याने बागायतदार तिकडेच आंबा पाठवत आहेत.

गेल्या तीन महिन्यांत बाजार समितीमध्ये लाखाहून अधिक देवगड, रत्नागिरी हापूस आंब्याच्या बॉक्सची आवक झाली. चांगल्या प्रतीच्या हापूसचे दर ५०० पासून १४०० रुपये डझनापर्यंत गेले. कोल्हापूरच्या बाजारपेठेत कर्नाटक, आंध्र व इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात आंबा विक्रीसाठी येत आहे. दरही तीनशे रुपये डझन असल्यामुळे आंबा खरेदीसाठी ग्राहकांचा कल वाढल्याचे दिसते.

नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या कालावधीत दाट धुके, कडाक्याची थंडी, अवकाळी पावसामुळे मोहोरासह कैरीचे नुकसान झाले. फळांचे संकरीकरण व्यवस्थित झाले नाही. फेब्रुवारीपासून पस्तीस ते चाळीस अंश डिग्रीवर तापमान गेल्यामुळे आंबा पिकण्याच्या प्रक्रियेवर परिणाम झाला. परिणामी, यंदा हंगामात हापूसचे उत्पादन घटल्याचे चित्र दिसते. सध्या बाजारात हापूस आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचे दिसते.

हापूस जर्मनी, दुबई, युरोपच्या बाजारात

ग्लोबल कोकण संस्थेच्या माध्यमातून युरोपच्या बाजारात कोकण परिसरातील आंबा बागायतदार थेट निर्यात करत आहेत. कोकणातील पाचशेहून अधिक बागायतदारांनी एकत्र येऊन या हापूस आंब्याचे जगभरात मार्केटिंग सुरू केले. बागायतदारांनी तीस ते चाळीस हजार डझन हापूस आंब्याची परदेशी बाजारपेठेत निर्यात केली आहे.

हापूसची तहान पायरी आंब्यावर..

बाजारपेठेत हापूस आंब्याचे दर अजूनही चढेच आहेत. त्यामुळे ग्राहक पायरी आंब्याची खरेदी करत असून, त्याचा डझनाचा दर तीनशे रुपये आहे. तसेच बाजारपेठेसह सर्वत्र विक्रीसाठी हा आंबा आला असून, लोकांना सहज उपलब्ध होत आहे.

बदलत्या वातावरणामुळे यंदा हापूस आंब्याचे उत्पादन घटले आहे. परदेशातही आंब्याची निर्यात होत आहे. हापूसपासून ज्यूस व अन्य पदार्थ बनवण्यासाठी आंबा बागायतदारांनी स्वतःची मशनरी खरेदी केली आहे. तसेच दर चांगला मिळत असल्यामुळे इतर कंपन्याकडेही हापूस आंबे पाठवले जात आहेत.

- पंडित पाटील, आंबा बागायतदार, कळंबा (सध्या रत्नागिरी)

कोल्हापूर बाजार समितीमध्ये हापूस आंब्याची आवक घटली आहे. त्यामुळे दरही चढेच राहिले. परिणामी मद्रास, कर्नाटक यासह अनेक परराज्यांमधून आंब्यांची आवक वाढली आहे. दरही परवडणारे असल्याने ग्राहकांमधून कर्नाटक, मद्रास हापूस आंब्याला मागणी वाढत आहे.

- रामचंद्र दाष्टे, विभाग प्रमुख, फळ-भाजीपाला, कोल्हापूर बाजार समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIFA World Cup 2026 : मेस्सी विरुद्ध रोनाल्डो QF मध्ये भिडणार; वर्ल्ड कप २०२६ चे गट जाहीर, डोनाल्ड ट्रम्प यांना 'शांतता' पुरस्कार

MPSC Exams 2026: एमपीएससी 2026 वेळापत्रक जाहीर; राज्यसेवा, वनसेवा, गट-ब–क परीक्षांचे दिनांक स्पष्ट

Panchang 6 December 2025: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

क्रिकेटप्रेमींसाठी ६ डिसेंबर आहे खास...आज एक दोन नव्हे तर तब्बल ११ क्रिकेटपटूंचा वाढदिवस 'Birthday Special-11' एकदा वाचाच...

DK शिवकुमार-जारकीहोळी भेटीमागचे राजकारण गडद; सत्तावाटपावरून काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली, संक्रातीपर्यंत निर्णय होणार?

SCROLL FOR NEXT