कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाच्या कर्मचाऱ्यांचा 70 लाख भविष्य कल्याण निधी व 28 लाखांहून अधिक रुपयांची ग्रॅच्युईटी आदा केली. खतांसोबत मीठ, वॉशिंग पावडर, खाद्य तेलाची शेतकरी संघाच्या ब्रॅंडवर विक्री केली जात आहे. यंदा संघाला 30 लाखांचा नफा झाला असून आणखी पेट्रोल पंप सुरू करण्याचा मानस अध्यक्ष जी. डी. पाटील यांनी व्यक्त केला. संघाची आज 80 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन झाली. यावेळी विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी दिली. जिल्हा बॅंकेकडे संगम टॉकीजजवळील जागेसाठी द्यावे लागणारे आहेत त्या 2 कोटी 82 लाखांसाठी न्यायालयात दावा दाखल केला आहे.
अध्यक्ष जी. डी. पाटील म्हणाले, ""यावर्षीही "अ' ऑडिट वर्ग मिळाला आहे. यंदा 11 टक्के लाभांश दिला जाणार आहे. बैल छाप दाणेदार व हातमिश्र खतांची मागणी वाढत आहे. 31 मार्चअखेर 6301 टन खतनिर्मिती झाली आहे. कृषी उद्योगचे 1727 टन उत्पादन संघाने करून दिलेले आहे. सर्व देणे दिली आहेत. सर्व पेट्रोल पंप पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. लॉकडाऊनमुळे यावर्षी उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे निव्वळ नफ्यात आणखी वाढ झाली असती. नोकर खर्चात महागाई भत्ता 68 लाख रुपयांचा दिसत आहे.''
ते म्हणाले, ""संचालक मंडळाने काटकसर करत खर्च कमी केला आहे. 325 कर्मचारी कार्यरत आहेत. सेवानिवृत्त, राजीनामा, कमी केलेले असे एकूण 7 कर्मचारी आहेत. यावर्षी 70 लाख 27 हजार 22 रुपये प्रॉव्हिडंड फंड व 28 लाख 65 हजार 235 रुपये ग्रॅच्युईटी दिली आहे. 3 कोटी 80 लाख 98 हजार 962 रुपये थकीत होते. यापैकी 31 जानेवारी 2021 अखेर 56 लाख 35 हजार 374 रुपये येणेबाकी आहे.''
संचालक अमरसिंह माने यांनी आभार मानले. कार्यकारी संचालक आप्पासाहेब निर्मळ यांनी अहवाल वाचन केले. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, युवराज पाटील, संचालक व्यंकाप्पा भोसले, शशिकांत पाटील, आण्णासाहेब चौगले आदी उपस्थित होते.
उत्पन्नात भर
संघात वापरात नसलेली गोदाम, इमारती भाड्याने देऊन उत्पन्नात भर घातली आहे. कोटा भाड्यापासून 86 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत 20 लाखांनी वाढ झाल्याचेही पाटील यांनी सांगितले.
ठेवी आणि बॉंडही
जिल्हा बॅंकेकडून घेतलेल्या 5 कोटी कर्जापैकी गरजेनुसार उचल केली आहे. सध्या 3 कोटी 57 लाख रुपये कर्ज उचल केली आहे. सारस्वत बॅंकेत 50 लाख रुपयांच्या ठेवी आहेत. जिल्हा बॅंकेत 1 कोटीची ठेव व 10 लाखांचे बॉंण्ड घेतले आहेत. त्यापासून संघाला जादा व्याजदर मिळत असल्याचेही अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
संपादन - यशवंत केसरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.