Properly planned, but no rain ...
Properly planned, but no rain ... 
कोल्हापूर

योग्य नियोजन केले, पण जुलै मध्यावरही पावसाची दांडी

सुनील पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे, दोन किंवा तीन दिवसांतून एकदाच जोरदार पाऊस होतो. गेल्यावर्षी (2019) जिल्ह्यात जुलैमधील 14 दिवसांत 341 मिलिमीटर पाऊस झाला होता. यावर्षी सरासरी चौदा दिवसांत 147 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी धरणातही सुमारे 1 टीएमसी पाणीसाठा कमी आहे. गेल्या वर्षीच्या पुराचा अनुभव पाहता जलसंपदा विभागाने योग्य नियोजन केले आहे. 

गेल्यावर्षी अतिवृष्टीने जिल्ह्याला झोडपून काढले. एक दिवसही पावसाने उसंत घेतली नव्हती. त्यामुळेच गेल्यावर्षी उच्चांकी नोंद झाली. याउलट यावर्षी परिस्थिती आहे. 1 जुलैपासून जिल्ह्यात सरासरी 147 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर गेल्यावर्षी जुलैमध्ये 341 मिलिमीटर पाऊस झाला. गेल्यावर्षीच्या तुलनेत 194 मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे. 

जिल्ह्यातील राधानगरी धरणात गेल्यावर्षीच्या तुलनेत 1 टीएमसीने पाणीसाठा कमी आहे. राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडीसह इतर तालुक्‍यांतही पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे उसाला पोषक ठरणारा हा पाऊस असला तरीही भात, भुईमूग, सोयाबीनसाठी आणखी जोरदार पावसाची गरज आहे. राधानगरी धरणाची पाणी पातळी व्यवस्थित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

14 जुलै 2019 व 14 जुलै 2020 चा तुलनात्मक धरणातील साठा (टीएमसीमध्ये) 

धरण----2019----2020 
-------------------------- 
राधानगरी----5.50----4.82 
तुळशी----1.92----1.74 
वारणा----18.44----18.47 
दूधगंगा----9.63----15.20 

गेल्यावर्षी अतिवृष्टी झाली. जुलैअखेरनंतर ते ऑगस्टमध्ये जोरदार पाऊस झाला. यावर्षी आत्तापर्यंत पावसाचे प्रमाण कमी आहे. गेल्यावर्षीचा अनुभव पाहता, यावर्षी सर्वच धरणातील आवश्‍यक पातळीवर आणला आहे. राधानगरी धरणातील पाणीसाठाही गेल्यावर्षीच्या तुलनेत सुमारे एक टीएमसीने कमी ठेवला आहे. 
- रोहित बांदिवडेकर, कार्यकारी अभियंता, जलसंपदा. 


दृष्टिक्षेप 
- दोन-तीन दिवसांतून पडतो एकदाच मोठा पाऊस 
- गतवर्षी 14 जुलैपर्यंत 341 मिलिमीटर पाऊस 
- यावर्षी 14 जुलैपर्यंत 147 मिलिमीटर पाऊस 
- गेल्यावर्षीच्या तुलनेत 194 मिलिमीटर कमी पाऊस 
- राधानगरी, गगनबावडा तालुक्‍यातही पावसाचे प्रमाण कमीच 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT