कोल्हापूर

'नही जायेंगे काम को, क्या खायेंगे शाम को'; कोल्हापुरात व्यापाऱ्यांचे अनोखे आंदोलन

व्यापाऱ्यांनी बंद दुकानासमोर थांबून विविध मागण्यांचे फलक हातात धरले होते

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : "नही जायेंगे काम को, क्या खायेंगे शाम को" यासह इतर बोलके स्लोगन असलेले फलक हातात घेऊन आज दुपारी 12 पर्यंत सर्व व्यापाऱ्यांनी सर्व दुकाने बंद करून अनोखे आंदोलन केले. यामध्ये जीवनावश्यक असलेल्या किराणासह अत्यावश्यक असलेल्या औषध दुकानदारांनी सुद्धा सहभाग घेतला. (emergency service)अनलॉकमध्ये (unlockd) सरसकट सर्वच दुकाने सुरू करावी, या मागणीसाठी आज सर्व व्यापाऱ्यांनी दुपारी 12 पर्यंत जीवनावश्यक व अत्यावश्यक दुकाने बंद ठेवली. सकाळी दहा ते दुपारी बारा दरम्यान व्यापाऱ्यांनी बंद दुकानासमोर थांबून विविध मागण्यांचे फलक हातात धरले होते. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (chamber of commerce and industry) या व्यापाऱ्यांच्या शिखर संस्थेने केलेल्या आवाहनानुसार 43 विविध संघटना या अनोख्या आंदोलनात सहभागी झाले झाल्या होत्या.

सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये (kolhapur district) सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यासाठी परवानगी आहे, मात्र सरसकट सर्वच दुकानांना परवानगी मिळावी यासाठी व्यापाऱ्यांनी हे आंदोलन केले. सकाळी दहाच्या सुमारास चेंबर ऑफ कॉमर्ससह इतर संघटनांचे पदाधिकारी महाद्वार रोडवरील गुजरी कॉर्नर येथे दुकानांसमोर थांबून होते. संपूर्ण महाद्वारावर व्यापाऱ्यांनी साखळी पद्धतीने हातात मागण्यांचे फलक धरून सरसकट सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगीची मागणी केली.

राजारामपुरी मुख्य (rajarampuri kolhapur) रस्ता, लक्ष्मी रोड, शिवाजी रोड, उद्योग नगरातील ऑटोमोबाईल्स यासह शहरातील इतर ठिकाणी व्यापारी आपापल्या बंद दुकानासमोर थांबून होते. दुकानदारांच्या हातात असणारे फलक बोलके होते. त्यांचे होत असणारे नुकसान त्यांनी फलकाद्वारे व्यक्त केले. लॉकडाउनमध्ये (lockdown) सुद्धा खुल्या असणाऱ्या धान्य ओळीत आज पूर्ण शांतता होती. सर्व दुकानांचे शटर डाउन होते. अनेक व्यापारी दुकानाबाहेर थांबून होते. या परिसरात असणारी भाजी मंडई मात्र सुरू होती. तेथे ही ग्राहकांची संख्या अत्यल्प असल्याचे दिसून आले. दरम्यान व्यापाऱ्यांच्या या अनोख्या आंदोलनात सोशल डिस्टन्स राहावा, कोरोना प्रतिबंधक उपायांचे पालन व्हावे यासाठी पोलिस रस्त्यावर दिसत होते. पोलिस जीपवरील ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना वारंवार सूचना दिल्या जात होत्या.

चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, की दोन महिन्यांहून अधिक काळ सर्व दुकाने बंद आहेत, मात्र या काळातील कर, कामगारांचा पगार, विजेचे बिल आणि इतर सर्व बाबी सुरू आहेत. यासाठी अनुदान म्हणून पॅकेज द्या, अन्यथा सरसकट सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या, अशी मागणी आम्ही पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे ही केली आहे. मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे आम्ही आज सुमारे अडीच हजाराहून अधिक दुकानदार या आंदोलनात सहभागी झालो आहोत. विशेष म्हणजे जीवनावश्यक असलेला सर्व किराणा दुकानदार आणि अत्यावश्यक असलेला औषध दुकानदार सुद्धा या बंदमध्ये सहभागी झाला आहे. या मागणीचे गांभीर्याने न घेतल्यास दुकानदार स्वतःहून दुकाने सुरु केल्याशिवाय राहणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: डाळी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास नाफेड मार्फत भारत सरकार ते खरेदी करणार-अमित शाह

आम्ही सगळे थोडे घाबरलोय कारण... वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीबद्दल काय म्हणाला विकी कौशलचा भाऊ सानी कौशल?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Solapur News: सोलापुरात पूर ओसरल्यानंतरही डेंगी-टायफॉईडचा प्रादुर्भाव; मनपाकडून घरोघरी तपासणी सुरू

SCROLL FOR NEXT