The public health plan should not hamper the beneficiaries 
कोल्हापूर

जनआरोग्य योजना लाभार्थींची अडवणूक नको 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : " महात्मा फुले जनआरोग्य योजनेची माहिती सविस्तर सांगा उपचार चांगले करताच पण कोणाचे नुकसान होणार नाही. याची काळजी घ्या, याबरोबर प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची अधिक तपशीलवार माहिती रूग्णांना देऊन या योजनेचा लाभ जास्ती जास्त गरजू रूग्णांना होईल, असे प्रयत्न करा. योजनेच्या अटीशर्ती राबविताना डॉक्‍टरांना ज्या अडचणी येतात. त्याही आम्हाला सांगा, आम्ही त्या सोडविण्याचा प्रयत्न करू.'' असे ठोस अश्‍वासन आमदार प्रकाश आबीटकर यांनी आज येथे शासकीय विश्रामधाम येथे झालेल्या आढावा बैठकीत दिले. 

महात्मा फुले, आयुष्य मान भारत योजनेची अंमलबजावणीतील अडचणी समजून घेण्यासाठी श्री. आबीटकर यांनी योजनेत समाविष्ठ असलेल्या सर्व खासगी व शासकीय रूग्णालयातील डॉक्‍टर व व्यवस्थापक, कर्मचारी यांची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा समन्वयक डॉ. सुभाष नांगरे यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. कॅम्पीपाटील या प्रमुख उपस्थितीतही बैठक झाली. 

डॉक्‍टरांनी काही अडचणी सांगितल्या. यात एखादा रूग्ण योजनेत बसतो की नाही त्याची मंजूरी येण्यासाठी एक दोन दिवस लागतात तो पर्यंत तर काही वेळा एखादी चाचणी करण्यासाठी रूग्णाला बाहेर पाठवावे लागते. तेव्हा त्याचा खर्च झाला तर आम्हाला दोष दिला जातो. यावर डॉ. कॅम्पीपाटील यांनीही रूग्ण उपचाराला येतो. तेव्हा त्याची प्राथमिक तपासणी, चाचण्या करून त्याचा अहवाल वेळीच योजना समितीकडे पाठवा. त्यातून मंजूरी लवकर येऊ शकेल. तसेच प्रक्रीयेची माहिती रूग्णांना सविस्तर द्यावी, म्हणजे गैरसमज होणार नाहीत, असेही सांगितले. 

वैद्यकीय सहायत्ता कक्ष लवकरच स्थापन करण्यात येणार असून यातून गरजू लोकांपर्यंत जन आरोग्य योजनांचा लाभ पोहचविण्यासाठी मदत करण्यात येईल. मात्र नियम सोडून कोणी गरजू घटकाला लाभापासून वंचित ठेवले तर त्याचा जाबही कायदेशीर चौकटीत विचारला जाईल असा इशाराही श्री आबीटकर यांनी दिला. 

पाच लाखा पर्यंतचे उपचार... 
सामाजिक, अर्थिक जातीय जनगणना 2011 आधारित वशिष्ठ निकषानुसार निवडलेल्या ठरवीक लाभार्थी कुटूंब यादीत नाव समाविष्ठ असणे महत्वाचे आहे. या यादीत नाव समाविष्ठ आहे की नाही याची माहिती mera.pmjay.gov.in या संकेस्थळावर किंवा 14555 या टोल फ्री क्रमांकावर मिळू शकते किंवा आरोग्य मित्र याची माहिती शोधून देऊ शकतात त्यानंतर शिधापत्रिका व आधार कार्ड देऊन या योजनेचा मोफत लाभ घेता येऊ शकतो. या योजने पाच लाख पर्यंतचे उपचार होतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

Ratnagiri : देव तारी त्याला कोण मारी! पुण्यातील पर्यटक समुद्रात वाहून जात होता..., स्थानिकांनी प्रसंगावधानामुळे वाचला; थरारक क्षण

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT