Public Toilets Have Funding, But No Space! Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

सार्वजनिक शौचालयांना निधी आहे, पण जागाच नाही! गडहिंग्लजला असेही त्रांगडे...

अवधूत पाटील

गडहिंग्लज : गावागावात वैयक्तिक शौचालयांचे उद्दिष्ट गाठल्यानंतर शासनाने आता सार्वजनिक शौचालयांच्या उभारणीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी रोजगार हमी योजना आणि स्वच्छ भारत मिशनमधून निधीही उपलब्ध केला आहे. मात्र, ग्रामपंचायतींकडे शौचालयांच्या उभारणीसाठी स्वत:ची जागा नसल्याचे दिसून येत आहे. शिवाय रोजगार हमीचा मुद्दाही अडचणीचा ठरत आहे. तर काही गावात यापूर्वीच सार्वजनिक शौचालये आहेत. त्यामुळे गडहिंग्लजला 13 गावांतूनच प्रस्ताव दाखल झाले आहेत.

गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत मिशन आणले. या योजनेंतर्गत वैयक्तिक शौचालय उभारणीसाठी अनुदानाची तरतूद केली. चार हजार 600 रुपये असणारे या अनुदानात दोन वेळा वाढ होऊन आता 12 हजार रूपयांवर पोचले आहे. गेल्या काही वर्षांत या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली आहे. त्यामुळे जवळपास प्रत्येक गावात हागणदारीमुक्तीचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. परिणामी, शासनाने आता सार्वजनिक शौचालय उभारण्यावर भर दिला आहे. त्यासाठी अभियान हाती घेतले आहे. 

या अभियान अंतर्गत सार्वजनिक शौचालय उभारणीसाठी निधी उपलब्ध केला आहे. रोजगार हमी योजनेतून दोन लाख 10 हजार व पंधराव्या वित्त आयोगातून 90 हजार रुपये असे एकूण तीन लाख रुपये मिळणार आहेत. तसेच स्वच्छ भारत मिशनमधूनही दोन लाख 10 हजार व पंधराव्या वित्त आयोगातून 90 हजार रूपये मिळणार आहेत. यातून दोन शौचालय व दोन स्वच्छतागृह उभारता येणार आहेत. स्वच्छ भारत मिशनमधून मिळणारा निधी मागासवर्गीय विभागाचा आहे. त्यामुळे सदरची शौचालये दलित वस्तीत उभारणे आवश्‍यक आहे. 

मात्र, शौचालय उभारणीची जागा ग्रामपंचायतीच्या नावावर असणे अनिवार्य आहे. हीच अट अडचणीची ठरत आहे. अनेक ग्रामपंचातींकडे गावठाणमध्ये जागाच शिल्लक नाही. जी आहे ती गायरानमधील आहे. त्या जागेची मालकी जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. त्यांच्याकडे मागणी करुन जागा जिल्हा परिषदेच्या नावावर करण्याची प्रक्रिया क्‍लिष्ट आहे. जिथे ग्रामपंचायतींकडे जागा उपलब्ध आहे तिथे शौचालय उभारणे सोयीचे नाही अशी परिस्थिती आहे. शिवाय रोजगार हमी योजनेतून काम करणेही अडचणीचे ठरत आहे. परिणामी, 13 गावातूनच सार्वजनिक शौचालयांसाठी प्रस्ताव दाखल झाले आहेत. 

या गावातून प्रस्ताव... 
रोजगार हमी योजनेतून आठ गावात दहा युनिटचे प्रस्ताव आले आहेत. यामध्ये नंदनवाड, कुंबळहाळ, शिंदेवाडी, नेसरी, अर्जुनवाडी, अरळगुंडी, तनवडी, हसुरचंपू (तीन युनिट) या गावांचा समावेश आहे. तर स्वच्छ भारत मिशनमधून हिटणी, कडलगे, तेरणी, सांबरे, मुत्नाळ, नेसरी या गावातून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari and Next PM : ''म्हणून मोदींनंतर गडकरीच पंतप्रधान...''; काँग्रेस नेत्याने केलंय मोठं विधान!

Viral News : कारागिराने जबड्यात लपविले 15 लाखांचे सोने, पण 'या' एका चुकीमुळे उघड झाली चोरी

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Latest Marathi News Updates: "आजचा भारत अंतराळातून महत्त्वाकांक्षी दिसतो!": ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे शब्द

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

SCROLL FOR NEXT