कोल्हापूर

पुणे-बंगरूळ हायवे बंदच; उद्या सायंकाळनंतर सुरू होण्याची शक्यता

आज दिवसभरात पाण्याची पातळी दोन फुटाने कमी झालेली आहे.

युवराज पाटील

शिरोली पुलाची : सांगली फाटा येथे महापुराचे पाणी आल्याने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक आज दुसऱ्या दिवशी बंद राहिली. त्यामुळे सुमारे दहा हजारहून अधिक नागरिक अडकलेत. महामार्गावरील पाण्यामुळे सीएच्या परीक्षेला दहा विद्यार्थ्याना कोल्हापूर केंद्रावर पोचता आले नाही. त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले. आज दिवसभरात पाण्याची पातळी दोन फुटाने कमी झालेली आहे.

काल सायंकाळी महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाले. आज पाऊस उघडला असून, सूर्य दर्शन झाले आहे. तरीही पाणी पातळी संथगतीने कमी होत असून, महामार्गावर पाण्याचा वेग प्रचंड आहे. सायंकाळी सहा वाजता कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर सुमारे चार ते पाच फूट व पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर सुमारे आठ ते दहा फूट पाणी असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगीतले. पाऊस थांबला व पाण्याची पातळी कमी झाली तर उद्या सायंकाळनंतर महामार्गावरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी व्यक्त केली. जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून, सुरवातीला जेसीबी व अवजड वाहने पाठवून रस्त्याची चाचपणी केली जाईल, त्यानंतर अवजड वाहतूक सुरू करण्यात येईल व एका बाजूचे पाणी पूर्णपणे गेले तर एकेरी वाहतूक सुरू केली जाणार असल्याचे भोसले यांनी सांगीतले.

दिल्ली येथील द इनस्टीट्युट आँफ चार्टड आकौंटंटस आँफ इंडीया म्हणजे सीएची जुलै 2021 ची परीक्षा आजपासून सुरु झाली. एकुण चार पेपर आहेत. आज पहीला पेपर कोल्हापुर येथे होता. परिक्षार्थी आज कोल्हापुरला जाण्यासाठी शिरोलीत आले; मात्र त्यांना कोल्हापूरला जाता आले नाही. पालक व विद्यार्थ्यांनी दिल्ली येथील शिक्षण संस्थेशी संपर्क साधुन आजचा पेपर पुढ ढकलण्याची मागणी केली. एका जिल्ह्यासाठी परीक्षा थांबवता येणार नसल्याचे सांगत, संस्थेन स्पष्ट नकार दिला. त्यामुळ पुढचे तीन पेपर दिले तरीही नापास शेरा पडणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच प्रचंड नुकसान होणार आहे.

वाहतूक ठप्प झाल्याने सुमारे दहा हजार नागरिक अडकले आहेत. शिरोली येथील मदरसा व उमा भवनमध्ये प्रवाशांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. स्वयंसेवी संस्थाकडून प्रवाशांना चहा, नाष्टा व जेवणाची सोय करण्यात येत आहे. सांगली फाटा, नागाव फाटा, महाडिक बंगला येथे पोलिस बंदोबस्त असून, महामार्गावरील वाहतूक बॅरकेट लावून बंद केली आहे. तरी पूर पहायला नागरिकांची गर्दी होत आहे.

कोल्हापूरातून बोटीतून दोन प्रेत आणण्यात आली. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व औषधांची वाहतूक आज दिवसभर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या दोन बोटीतून सुरु होती. खासदार संजय मंडलिक व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील बोटीतून कोल्हापूरला गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Radhakrishna Vikhe Patil: दुष्काळावर विखे पाटलांचे मोठे वक्तव्य; ‘५ ऑक्टोबरपर्यंत चित्र स्पष्ट होईल, केंद्र-राज्य मिळून मदतीचा निर्णय’

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT