for pune election committee on election arun lad and shrimant kokate in kolhapur 
कोल्हापूर

राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर ठरणार भाजपची रणणीती

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गेल्या दीड वर्षाहून अधिककाळ अरुण लाड व श्रीमंत कोकाटे हे पदवीधरांच्या गाठीभेटी, मतदार फॉर्म भरून घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्नात आहेत. दोन्ही इच्छुक पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादीकडून शर्यतीत आहेत. मात्र राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार यावर भाजपची रणणीती ठरणार आहे. त्यामुळे या दोन्ही प्रबळ दावेदांरापैकी नंबर कोणाचा लागणार हे येणारा काळच ठरवणार आहे. 

२०१४ च्या निवडणुकीत पुणे मतदार संघात आघाडीत झालेल्या बंडखोरीमुळे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना निसटता विजय मिळाला होता. चुरशीच्या या निवडणूकीत चंद्रकांत पाटील २ हजार ३८० मतांच्या फरकाने विजयी झाले होते. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून सारंग पाटील आणि अरुण लाड दोघांनीही आपला दावा सांगितला होता. यामध्ये सारंग पाटील यांना संधी मिळाली. त्यामुळे अरुण लाड यांनी बंडखोरी केली होती.

मात्र दोघांमध्ये आघाडीची मते विभागली गेली आणि दोघांनाही पराभव पत्कारावा लागला. अरुण लाड यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी प्रयत्न केले. पण त्यांना यश आले नव्हते. शेवटी अरुण लाडही मैदानात उतरले होते. आगामी येऊ घातलेल्या निवडणुकीत अरुण लाड सुरुवातीपासून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणूनच पदवीधरांशी संर्पक साधत आहेत. विविध माध्यमातून त्यांच्या भेटीही घेत आहेत. तर, श्रीमंत कोकाटे हे पदवीधरांसाठी विविध योजना व विषय घेवून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांनीही राष्ट्रवादीकडूनच निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त उद्धव-राज ठाकरे येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT