Quarantine Center case in ichlkarnji 
कोल्हापूर

धक्कादायक ! क्वारंटाईन असलेल्या तरुणीसोबत घडला किळसवाना प्रकार...

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी  (कोल्हापूर) :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थात्मक विलगीकरण कक्षातील मुलीचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या प्रकरणी गावभाग पोलिसांनी  अमिर मरमसाब शेख (वय २१, रा. कोल्हापूर नाका) याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. या घटनेनंतर विलगीकरण केंद्राजवळ मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर संशयीत शेख याला विलगीकरण कक्षातून ताब्यात घेवून अटक केली आहे.


येथील प्रशासनाने एका शैक्षणिक संस्थेच्या हॉस्टेलमध्ये  कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. बाहेर गावांहून आलेल्या नागरीकांना येथील विलगीकरण कक्षात ठेवले जाते. पिडीत मुलगी सांगोला (जि.सोलापूर) येथून आई वडीलांसह इचलकरंजी असा प्रवास केला आहे. रेड झोन असलेल्या जिल्ह्यातून आल्यामुळे आयजीेएम रुग्णालयात वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना या ठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

यातील पिडीत मुलगी आज सकाळी केंद्रातील गर्ल्स हायस्कूलच्या स्नानगृहात स्नान करीत होती. त्यावेळी संशयीत शेख हा छप्पर नसलेल्या स्नानगृहाच्या भिंतीवर चढून पिडीत मुलीचा विनयभंग केला. या प्रकारानंतर या ठिकाणी एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे तणाव निर्माण झाला. पोलीस उप अधिक्षक गणेश बिरादार यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली. संशयीत शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. पिडीत मुलीने याबाबतची तक्रार दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon: माॅन्सूनची अजून पाच दिवसांची प्रतीक्षा! राज्यात ७२ टक्के कमी पावसाची नोंद, जूनच्या पहिल्या पंधरवड्यात बहुतेक जिल्ह्यांमध्ये अत्यल्प पाऊस

आजचे राशिभविष्य - 16 जून 2026

Moong Dal Palak Idli Recipe: प्रोटीन आणि आयर्नचा भरपूर खजिना; नाश्त्यासाठी बनवा मऊ अन् स्पंजी 'मूग डाळ-पालक इडली'

16 जून 2026 पंचांग! चंद्रदर्शन, त्रिपुष्कर योग आणि शुभ मुहूर्तांची माहिती

अस्थिबोध : गरम पाण्याची पिशवी की बर्फ?

SCROLL FOR NEXT