कोल्हापूर

कोल्हापुरला वीजांच्या गडगडाटसह वळीवाने झोडपले

सुनील पाटील

कोल्हापूर : जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह कोल्हापूर शहर (kolhapur city) परिसरात आज जोरदार पावसाने (rain) झोडपून काढले. आज दिवसभर ढगाळ वातावरणात ही लोकांना उष्म्याने (summer) हैराण केले होते. सायंकाळी (evening rain) सहानंतर झालेल्या जोरदार पावसाने ग्रामीणभागासह शहरवासीयांना दिलासा मिळाला. 

आठवड्यापासून शहरात व जिल्हामध्ये (kolhapur district) ढगाळ वातावरण (cloudy) होत आहे. तसेच कडक उष्मा जाणवत असल्याने लोकांच्या अंगाची लाही झाली होती. गेल्या दोन दिवसात ठीक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. आज मात्र शहर व शहर परिसरातील काही भागात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. सायंकाळी शहरातील उतार भागात पाणी साचून राहिले. शेतीसाठी (rain help to farming) हा पाऊस दिलासादायक मानला जात आहे. शेतीत अनेकांनी खरिपाची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. ज्यांनी भातासाठी शेती राखीव ठेवली आहे, अशा या शेतीसाठी या पावसाने दिलासा मिळाला असून ऊस पिकालाही अनेकांनी दिलेल्या खतांचा मात्रा लागू होणार असल्याचेही चित्र आहे.

साने गुरुजी (sane guruji road) रोडवर झाडाची फांदी कोसळली

जोरदार वाऱ्यामुळे कोल्हापूर राधानगरी रस्त्यावर साने गुरुजी वसाहत येथे एका मोठ्या झाडाची फांदी कोसळल्यामुळे या झाडाखालून जाणारे रिक्षा थोडक्यात बचावली. हे मोठी फांदी पडल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली पण तेथील नागरिकांनी ही फांदी हटवल्यामुळे काही मिनिटांतच वाहतूक पूर्ववत झाली.

झाडाचा आसरा

तावडे हॉटेल परिसरात जोरदार पावसाने झोडपल्यामुळे अनेक वाहतूकदारांनी मोठ्या झाडांचा आसरा घेतला. मात्र अशी झाडे उन्मळून पडण्याची शक्यता असल्याने झाडाखाली उभे राहणे धोकादायक असल्याचे आपत्ती व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

ICC Ranking: वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने भारताकडून हिसकावलं कसोटीचं सिंहासन; पण वनडे - टी20 मध्ये रोहितसेनाच अव्वल

Dharmendra And Hema Malini: 44 वर्षानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी पुन्हा केलं लग्न? रोमँटिक फोटो व्हायरल

Planet Nine : नेपच्यूनच्या पलीकडे असू शकतो आणखी एक ग्रह; आतापर्यंत राहिला होता लपून.. शास्त्रज्ञांना मिळाले नवे पुरावे!

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

SCROLL FOR NEXT