Radhanagari Dam Panchganga River esakal
कोल्हापूर

Kolhapur Rain : कोल्हापुरात पुराचा धोका टळला! पंचगंगेची पाणीपातळी 'इतक्या' फुटांवर; राधानगरी, चांदोली धरणात किती साठा?

पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसामुळं कुंभी धरणातून वाढवला पाण्याचा विसर्ग

सकाळ डिजिटल टीम

पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिल्यामुळे राधानगरीच्या (Radhanagari Dam) स्वयंचलित तीन खुल्या दरवाजांपैकी एक दरवाजा बंद झाला आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यात काल सकाळपर्यंत पावसाची रिपरिप कायम राहिली. दुपारनंतर अधूनमधून आलेल्या मोठ्या सरींशिवाय पावसाचे प्रमाण कमी राहिले. पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिल्यामुळे राधानगरीच्या (Radhanagari Dam) स्वयंचलित तीन खुल्या दरवाजांपैकी एक दरवाजा बंद झाला आहे.

धरणातून सध्या ४२५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कासारी प्रकल्प (Kasari Project) ८५ टक्के भरला असून २५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कुंभीतून ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीची (Panchganga River) पाणीपातळी ३१ फूट ६ इंचांपर्यंत कायम राहिली आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाणीपातळी कमी होत आहे.

गगनबावड्यात पावसाचा पुन्हा जोर

गगनबावडा : तालुक्यात गेले तीन दिवस रिपरिप सुरू असलेल्या पावसाचा जोर आज पुन्हा वाढला.पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसामुळे कुंभी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. परिणामी कुंभी नदीची पाणीपातळी वाढणार असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा कुंभी धरण प्रशासनाने दिला आहे.

तालुक्यात मागील तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी होता. येथील नद्या, ओढ्यांचे पात्र पूर्ववत झाले होते. मंगळवारी दुपारनंतर जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. सायंकाळी उशिरापर्यंत संततधार पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले.

कुंभी मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने जलाशय परिचलन सूचीनुसार पाणीपातळी नियंत्रित करण्याकरिता सद्य:स्थितीत  विद्युतनिर्मितीगृहातून सुरू असणाऱ्या ३०० क्युसेक विसर्गामध्ये वाढ करून  वक्रद्वारातून ३०० क्युसेक असा एकूण ६०० क्युसेक विसर्ग कुंभी नदीपात्रात सायंकाळी साडेचार वाजता सोडण्यात आला.

चांदोली धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला

तुरुकवाडी : वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून आवक पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी चांदोली धरण प्रशासनाने मंगळवारी दुपारी पुन्हा विसर्ग वाढवला आहे. ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे वारणा धरण ८५ टक्के भरले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरु आहे. पाणलोट क्षेत्रातून ९१६९ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे.

वीजनिर्मितीसाठी ८२५, वक्राकार दरवाजातून ५१५० असा एकूण ५९७५ क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू होता. आवक पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मंगळवारी दुपारी चार वाजता वीजनिर्मिती ८२५, वक्राकार दरवाजातून ७२७९ असा एकूण ८१०४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू ठेवला आहे. चांदोली धरणातून विसर्ग वाढविल्याने वारणा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT