rains break from the morning in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरात काल धुवाधार तर आज विश्रांती ; जनजीवन पूर्ववत

युवराज पाटील

कोल्हापूर - कालच्या दमदार पावसानंतर शहरात सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे जनजीवन पुन्हा एकदा रुळावर आले. काल सकाळपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली होती. दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. अशा स्थितीत दुसऱ्या दिवशी नेमकी पावसाची स्थिती काय राहणार ? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले होते. पहाटेच्या सुमारास पाऊस परत कोसळायला लागल्या नंतर सकाळी दहाच्या सुमारास चक्क सूर्याचे दर्शन झाले. दुपारी बारा नंतर पावसाने विश्रांती घेतली त्यामुळे व्यापारी पेठा, मंडई सह जनजीवन पुर्वरत झाले. पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत इशारा पातळी ओलांडली आहे. आज सकाळपासून पावसाची संततधार कायम राहिली असती तर पंचगंगा धोक्याच्या पातळीकडे गेली असती.

कालच्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. प्रमुख राज्यमार्गावर पाणी आल्याने भाजी विक्रेते शहरात येऊ शकले नव्हते. आज मात्र पाणी असल्याने सकाळपासूनच मार्केट यार्ड येथे लगबग सुरू झाली. शहरातील भाजी मंडई येथे वर्दळ सुरू झाली. एकंदरीत काल धुवाधार हजेरी आणि आज विश्रांती यामुळे शहर वासियांना पावसाने दिलासा दिला आहे.

ऑगस्ट 2019 मध्ये कोल्हापूर शहराला याच आठवड्यात विळखा घातला होता. कालच्या पावसामुळे आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. जिल्हा प्रशासनही कालच्या पावसामुळे खडबडून गेले होते. पालकमंत्र्यांनी काल रात्री पुराचे पाणी येणार या भागात भेट देऊन पाहणी केली होती. गरज पडल्यास नागरिकांचे तातडीने स्थलांतर करण्यासंदर्भात सूचना दिल्या गेल्या. सकाळपासून पावसाने विश्रांती घेत आणि प्रशासनानेही सुटकेचा निश्वास सोडला. दुपारी साडेबाराच्या सुमारास प्रमुख रस्त्यावरील जयंती नाला, असेंबली रोड, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर तसेच उपनगरांचा जो भाग काल पाण्याने भरून गेला होता येथील पाणीही उतरण्यास सुरुवात झाली. जुलै महिना कोरडा गेल्याने सर्वांचे लक्ष पावसाकडे लागले होते. एका दिवसात जुलै महिन्याची सरासरी पावसाने भरून काढली. कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाला, रंकाळा ही काठोकाठ भरला. आज सकाळपासूनच या दोन्ही तलावाच्या ठिकाणी मासेमारी करणाऱ्यांची गर्दी झाली. एकंदरीतच काल धडकी भरवणाऱ्या पावसाने आज मात्र दिलासा देऊन जनजीवन पूर्ववत आणण्यास मदत केली.

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT