The rains brought discrepancies in the district
The rains brought discrepancies in the district 
कोल्हापूर

जिल्ह्यात पावसाने आणली अवकळा

जिल्हा बातमीदार

इचलकरंजी : जिल्ह्यात आज अवकाळी पावसाने सर्वदूर हजेरी लावली. ऊसतोड मजूर, वीट भट्टी कामगारांची त्रेधा उडाली. पावसामुळे पंचगंगा कारखान्यालगतच्या मुख्य मार्गावर वाहने घसरण्याचा प्रकार घडला. वर्दळीचा आणि अपघात प्रवण क्षेत्र असणाऱ्या या रस्त्यावर तासाभरात सुमारे 100 वाहने घसरून पडली. यामुळे काही वाहनधारक किरकोळ जखमी झाले.

या रस्त्यावर साखर कारखान्याची मळी, ऊस वाहनातील टाकाऊ कचरा, तेल पडलेले होते. पावसामुळे ओलसर झालेले रस्ते त्यातच रस्त्यावर पडलेले चिकट पदार्थ यामुळे अनेक वाहने घसरून पडली. तासभर हे सत्र सुरूच होते. यामुळे काही काळ वाहतूक मंदावली होती. वाहनचालकांना सावध करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून यंत्रणा सज्ज करण्यात आली. 
अचानक पडलेल्या पावसामुळे वाहनधारकांची फजिती झाली. येणारे प्रत्येक वाहन सटासट रस्त्यावर घसरून पडत होते. आजूबाजूचे ट्रॅक्‍टरचालक, नागरिक वाहनधारकांच्या बचावासाठी धावत होते. पंचगंगा कारखान्याच्या अग्निशामक दलाने रस्ता वाहतुकीसाठी चकाचक केला. पंचगंगा कारखान्यावरून कबनूरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. पोलिसांनी ही वाहतूक डेक्कनमार्गे कबनूरकडे वळवली. 

तरुणांचा सहभाग 
वाहने घसरण्याचा प्रकार पाहून सभोवतालचे काही तरुण उत्स्फूर्तपणे पुढे आले. पुढे येऊन वाहनधारकांना सावध करण्याचे काम केले. रस्ता निसरडा असल्यामुळे वाहने सावकाश चालवा असे वारंवार सांगण्यात येत होते. 

बिद्री परिसरात ऊसतोडणीत व्यत्यय 
बिद्री : दुपारी चारनंतर परिसरात पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या. पावसाने ऊसतोडणी व वीट तयार करण्याच्या कामात पावसाने अडथळा आणला आहे. तासभर पडलेल्या पावसाने पाण्याचे पाट वाहत होते. ऊसतोड मजूर व शेतकरी तसेच वीट व्यावसायिक यांची तारांबळ उडाली होती. ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांत पाणी शिरल्याने साहित्य इतरत्र हलवले. 

उत्तूरला सरीवर सरी 
उत्तूर ः परिसरात दुपारी अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. सध्या ऊस तोडणी सुरु असल्याने पावसामुळे तोडणी कामात अडचण निर्माण होत आहे. 

गवत कापणी खोळंबली 
पिंपळगाव ः भुदरगड तालुक्‍यातील मुरुक्‍टे, मानवळे, किल्ले भुदरगड, पिंपळगावसह परिसरात आज अवकाळी पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या. पावसाने गवत कापणी खोळंबली. वाळलेल्या गवत पेंढ्या भिजल्या. वीटभट्टी व्यायसायिकांची तारांबळ उडाली. 

भाजीपाल्याला फटका 
जयसिंगपूर : ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या. रब्बी पिकांसह भाजीपाला पिकासाठी नुकसानकारक असणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे सर्दी, डोकेदुखीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. 

नागरिकांची त्रेधा 
सिद्धनेर्ली ः सिद्धनेर्लीसह परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. पावसामुळे ऊस तोडणीच्या कामात व्यत्यय येणार आहे. 

भुदरगडमध्ये सर्वदूर 
कोनवडे ः कुर, दारवाड, हेदवडे, मिणचेसह परिसरास आज दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. सायंकाळी 7 पर्यंत पावसाच्या सरी बरसत होत्या. पावसामुळे शेतात गेलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. भुदरगड तालुक्‍यातील जवळपास सर्वदूर पाऊस झाला. 

काजूला पाऊस पोषक 
आजरा ः आजरा तालुक्‍याच्या पूर्व भागात कोळींद्रे, मलिग्रे व कोवाडे परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. आज दिवसभरात क्विचितच सूर्यनारायणाचे दर्शन झाले. दिवसभर कुंद वातावरण होते. दुपार नंतर मलिग्रे, कोळींद्रे परिसरात पावसाला सुरवात झाली. तासभर या परिसरात पाऊस झाला. काजू पिकासाठी पोषक पाऊस झाल्याचे शेतकरी वर्गातून सांगण्यात आले. 

संपादन ः रंगराव हिर्डेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: "पंतप्रधान मोदी मंगळसूत्र आणि बांगड्यांबद्दल बोलतात, मात्र ऑलिम्पिकपटूंचा लैंगिक छळ होताना ते गप्प असतात," प्रियंकांचा हल्लाबोल

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Rajesh Joshi : नागपूरचे राजेश जोशी आशिया बुकमध्ये; केली सर्वात छोट्या व हलक्या विमानाची निर्मिती

खासदार रेवण्णांची धजदमधून हकालपट्टी होणार?ऐन निवडणुकीत माजी पंतप्रधानांच्या नातवावर अटकेची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT