चला, लोकराजाला अभिवादन करूया!
चला, लोकराजाला अभिवादन करूया! sakal
कोल्हापूर

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी

राजेश नागरे

कोल्हापूर लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दीचा मुख्य सोहळा उद्या (शुक्रवारी) श्री शाहू छत्रपती मिलमध्ये सकाळी अकराला होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ऑनलाईन पद्धतीने उपस्थित असतील. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची प्रमुख उपस्थिती असेल.

दरम्यान, मुख्य सोहळ्यापूर्वी दहा वाजता राजर्षी शाहूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तमाम कोल्हापूरकर शंभर सेकंद स्तब्धता पाळणार आहेत. सकाळी दहा वाजता एकाच वेळी ‘जिथे असेल तिथे’ हा उपक्रम होणार असून, सारे शहर आणि जिल्हा शंभर सेकंदासाठी स्तब्ध राहून राजर्षी शाहूंना अभिवादन करणार आहे.

कोल्हापूर शहर आणि परिसरातील पाच ठिकाणांहून व प्रत्येक तालुक्यातून सकाळी कृतज्ञता व समता फेरींना प्रारंभ होईल. सकाळी साडेनऊपर्यंत या सर्व फेरी नर्सरी बागेतील श्री शाहू छत्रपती महाराज समाधीस्थळ येथे पोहोचतील. त्यानंतर दहाला आदरांजलीचा उपक्रम होईल. त्यानंतर शाहू मिलमध्ये होणाऱ्या मुख्य सोहळ्यात राजर्षी शाहू चरित्र साधने प्रकाशन समितीच्या

वतीने प्राचार्य रा. कृ. कणबरकर लिखित ‘Glimpses of Rajarshi Shahu Maharaj’ या इंग्रजीतील शाहू चरित्राचे प्रकाशन होईल. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कृतज्ञता पर्व समितीने केले आहे.

पूर्वसंध्येला कॅंडल मार्च

राजर्षी शाहू स्मृतिशताब्दीच्या पूर्वसंध्येला शहरातील सर्व प्रेरणास्थळे व वारसास्थळांचा परिसर विद्युतरोषणाईने उजळून निघाला आहे. सायंकाळी सहाला पालकमंत्री सतेज पाटील, मधुरिमाराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीत दसरा चौकातून कॅंडल मार्चला प्रारंभ झाला. राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसह शाहूप्रेमींचा मोठा सहभाग होता. दसरा चौकातून नर्सरी बागेतील राजर्षी शाहू समाधीस्थळ कॅंडल मार्चची सांगता झाली. पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे बिंदू चौक, दसरा चौक ते शाहू समाधीस्थळापर्यंत कॅंडल मार्च झाला. नंदकुमार गोंधळी, दगडू भास्कर आदींसह शंभरहून अधिक कार्यकर्त्यांचा सहभाग होता. एस. के. रोलर स्केटिंग ॲकॅडमी, ओरिएंटल इंग्लिश मीडियम स्कूल, जिल्हा बार असोसिएशनतर्फे शंभर स्केटिंगपटूंनी दसरा चौक ते शाहू समाधीस्थळापर्यंत मशाल फेरी काढली.

आज होणारे विविध कार्यक्रम

युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्यातर्फे दुर्मिळ शिवराई सुवर्ण होनचे दर्शन (स्थळ ः भवानी मंडप, सकाळी दहा ते रात्री आठ)

शाहू मिल येथून दुपारी तीन वाजता छत्रपती शाहू महाराजांचे जीवन व कार्यावर आधारित चित्ररथ फेरीचे उद्‍घाटन

हिरकमहोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्‍घाटन (संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, सायंकाळी चार वाजता)

शाहू मिल येथे सायंकाळी पाच ते सात या वेळेत करवीर तालुका शिक्षक संघटनेचा स्वरांजली कार्यक्रम

राजर्षी शाहू खासबाग मैदानात सायंकाळी साडेसातनंतर महा तालवाद्य महोत्सव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते राज्यघटना फेकून देतील, राहुल गांधी यांचा आरोप

SCROLL FOR NEXT