Rajesh Kshirsagar vs Ambadas Danve esakal
कोल्हापूर

दानवेंच्या कोल्हापुरातील स्टंटबाजीला छत्रपती संभाजीनगरात येऊन उत्तर देणार; क्षीरसागरांचा गर्भित इशारा

दानवे हे जनतेतून निवडून न येता मागच्या दरवाजाने आमदार होवून विरोधी पक्षनेते बनले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

‘विरोधी पक्षनेता फार मोठे पद आहे. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या संस्काराचा अपमान होऊ नये म्हणून आम्ही त्यांना विरोध केला नाही.'

कोल्हापूर : खासगी सावकारी विरोधात सर्वसामान्य कुटुंबीयांना न्याय मिळवून देताना राजकीय बदनामीपोटी आखण्यात आलेल्या षड्‌यंत्र विरोधी पक्ष पाठीशी घालत असल्याचे आज पुन्हा सिद्ध झाले. राजकीय बदनामी करण्यासाठी एका विरोधी पक्षनेत्याला खासगी सावकाराच्या बाजूने उभे राहून पोलिस प्रशासनाला धारेवर धरावे लागते. म्हणजेच विरोधी पक्षनेते कॉंग्रेसप्रणीत खासगी सावकारीला पाठबळ देत आहेत, असे पत्रक राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी प्रसिद्धीस दिले.

पत्रकात म्हटले आहे, दानवे यांनी कोल्हापुरात येवून एखाद्या लोकप्रतिनिधीचा एकेरी भाषेत उल्लेख केला. यावरून त्यांच्या संस्काराचे दर्शन होते. दानवे हे जनतेतून निवडून न येता मागच्या दरवाजाने आमदार होवून विरोधी पक्षनेते बनले आहेत. त्यामुळे त्यांना जनतेच्या प्रश्नाची जाण नाही. राजकीय हेतूने अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केलेल्या स्टंटबाजीस छत्रपती संभाजीनगर मध्ये (Chhatrapati Sambhajinagar) येवून उत्तर देवू.’

दरम्यान, घटनास्थळी असलेले ऋतुराज क्षीरसागर म्हणाले, ‘विरोधी पक्षनेता फार मोठे पद आहे. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या संस्काराचा अपमान होऊ नये म्हणून आम्ही त्यांना विरोध केला नाही. त्या कुटुंबीयांची भेट घेवून सांत्वन होत असल्यास आम्हाला आनंद आहे. पोलिस प्रशासन त्यांच्याप्रमाणे कारवाई करीत आहे. आम्ही दोषी असल्यास कारवाई होईल.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT