कोल्हापूर

तर हेच तरुण तुमच्या गळ्याला फास लावतील; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही राज्यसरकावर टिकास्र सोडले

स्नेहल कदम

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परिक्षेत (MPSC Exam) उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी (Job) नसल्याच्या तणावातुन व आर्थिक परिस्थितीमुळे एका विद्यार्थ्याने (Student) गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी साडे चार वाजता फुरसुंगी जवळील गंगानगर येथे घडली. या प्रकरणावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला (mahavikas aghadi sarkar) धारेवर धरलं आहे. अनेक राजकीय वर्तुळातून यावर चर्चा सुरु आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (raju shetti) यांनीही राज्यसरकावर टिकास्र सोडले आहे.

ते म्हणतात, महाविकासआघाडी सरकारने आतातरी डोळे उघडून त्यांच्या प्रश्नाकडे डोळसपणे बघून त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे प्रश्न सोडवावेत, अन्यथा हेच तरूण एक दिवस तुमच्या गळ्याला फास लावल्याशिवाय सोडणार नाहीत. असा इशारा त्यांना दिला आहे. याशिवाय त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहनही केले आहे. यामध्ये ते म्हणाले, स्वप्नील लोणकर या तरुणाने MPSC कडून वेळेत मुलाखत न झाल्याने आत्महत्त्या केली. प्रिलियम व मेन्स क्लिअर केलेल्या स्वप्नीलचा मुलाखतीसाठी होणाऱ्या विलंबाने मात्र धीर खचला, त्याने जीव दिला. माझी सर्व विद्यार्थ्यांनी विनंती आपण अशी टोकाची भुमिका घेऊ नका.

दरम्यान स्वप्नीलचे (swapnil lonkar) वडील सुनील लोणकर यांचा शनिवार पेठेत बिल बुक बनविण्याचा छोटा प्रिटींग प्रेसचा व्यवसाय आहे. स्वप्नीलने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली होती. स्वप्नीलचे आई-वडील नेहमीप्रमाणे कामानिमित्त बाहेर पडले. तेव्हा, स्वप्नीलने त्याच्या खोलीमध्ये गळफास घेतला होता. त्याला रुग्णालयात हलविल्यानंतर डॉक्‍टरांनी त्यास मृत घोषीत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT