कोल्हापूर

आम्ही काटा काढण्यासाठी एकत्र आलो नाही - राजू शेट्टी

जितेंद्र आणुजे

शेतकरी आणि ‘नाबार्ड’मधील दुवा म्हणजे केडीसीसी बँक आहे.

नृसिंहवाडी : कुणाचा काटा काढण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आलो नाही. शेतकरी आणि ‘नाबार्ड’मधील दुवा म्हणजे केडीसीसी बँक आहे. बॅंकेच्या माध्यमातून गणपतराव पाटील यांनी क्षारपड जमीनमुक्तीबरोबर अनेक गोष्टींचा विकास करून ‘नाबार्ड’च्या योजना शेतकऱ्यांच्या बांधावर आणणे गरजेचे आहे. यासाठी सर्वजण गणपतराव पाटील यांच्या विजयासाठी एकत्र आलो आहोत, असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे बोलताना व्यक्त केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे महादबा पाटील मठात झालेल्या प्रचारसभेत उद्यान पंडित व दत्त उद्योगसमूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्या प्रचारप्रारंभप्रसंगी ते बोलत होते.

माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले, 'हा तालुका नेहमी पैशांच्या नाही, तर कामाच्या पाठीशी राहिला आहे. अफवा पसरविणे विरोधकांचे काम आहे. त्यावर विश्वास ठेवू नये.' प्रचार प्रारंभप्रसंगी कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयराम पाटील, 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, डॉ. संजय एस. पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, दलितमित्र अशोकराव माने, माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, अर्बन बँकेचे संचालक महादेव धनवडे उपस्थित होते.

गणपतराव पाटील म्हणाले, 'तालुक्यातील क्षारपड जमिनीचा प्रश्न गंभीर आहे. जमीन क्षारपडमुक्त करण्यासाठी नाबार्ड आणि बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून ही जमीन अधिकाधिक पुन्हा लागवडीखाली आणण्यासाठी प्रयत्न असेल. बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी, या उद्देशाने सर्वांच्या आग्रहाखातर आपण ही उमेदवारी स्वीकारली आहे.'

शिवसेनेचे तालुकाप्रमुख वैभव उगळे, माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे, अशोकराव कोळेकर, कुरुंदवाड काँग्रेस शहराध्यक्ष विजय पाटील, मोहिनुद्दिन पठाण, औरवाड सरपंच अशरफ पटेल, बाबासाहेब सावगावे, दत्त कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील, रणजित पाटील, शेखर पाटील आदी मान्यवरांसह ठरावधारक व कार्यकर्ते उपस्थित होते. जितेंद्र आणुजे यांनी सूत्रसंचालन केले. अवधूत धनवडे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

IPL 2024 MI vs LGS : मुंबईचा ‘प्लेऑफ’चा मार्ग खडतर ; लखनौचा विजय,स्टॉयनिसची चमक

Bicycle Crunches: सायकल क्रंच करताना 'या' चुका करू नका, जाणून घ्या योग्य पद्धत

Mumbai News: दुर्गम भागातील नाही, भांडुपमधील प्रकार! डॉक्टरांनी केली टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती, महिलेसह बाळाचा मृत्यू!

Latest Marathi News Live Update : मी आतापर्यंत कोणालाही धमकी दिली नाही- अजित पवार

SCROLL FOR NEXT