Raju Shetti Sakal
कोल्हापूर

Raju Shetti : 400 रुपये घेतल्याशिवाय उसाचे कांडेसुध्दा तोडू देणार नाही; राजू शेट्टींचा साखर कारखान्यांना स्पष्ट इशारा

कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या (Farmer) घामाच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

शेतकरी संघटनेने याकडे लक्ष दिल्यावर जिल्ह्यातील २० कोटी रुपये वसूल झाले आहेत.'

म्हाकवे : प्रत्येक साखर कारखान्याला मागील हंगामातील उसाला (Sugarcane Rate) प्रती टन ४०० रूपये देणे शक्य आहे. परंतु, कागदोपत्री हिशोबात गोलमाल करून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ३७ साखर कारखानदारांनी (Sugar Factory) गतवर्षीच्या गळीत हंगामातील १२०० कोटी हाणले आहेत, असा आरोप राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केला.

दिवस रात्र शेतामध्ये कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या (Farmer) घामाच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ४०० रुपये घेऊन १५ लाख शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायचे आहे. यासाठीच हा आमचा संघर्षयज्ञ आहे, असे प्रतिपादनही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले.

गोरंबे (ता. कागल) येथे आयोजित केलेल्या आक्रोश पदयात्रेतील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच शकुंतला बाबूराव ढोले होत्या. शेट्टी म्हणाले, ‘कारखान्यांची हिशोबपत्रके अभ्यासूनच आम्ही ४०० रूपये घेण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे प्रत्येक साखर कारखान्यांनी ते द्यावेत. अन्यथा संघटना उसाचे एक कांडेही तोडू देणार नाही.

'यासाठी आम्हाला राज्यातील ऊस तोडणी वाहतूक संघटनेने पाठिंबा दिला आहे. हे आंदोलन फक्त शेतकऱ्यांचे नसून संपूर्ण समाजाचे आहे. ऊस दरावर संपूर्ण समाजाचे आर्थिक हित दडले आहे. वाहनधारकांना मुकादमांनी ४५०० कोटी रूपयाना बुडवले. कारखान्यांनी याकडे दुर्लक्ष केले. शेतकरी संघटनेने याकडे लक्ष दिल्यावर जिल्ह्यातील २० कोटी रुपये वसूल झाले आहेत.'

स्वागत सुहास कोगनोळे यांनी केले. संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळासो पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर, सुर्यभान जाधव (सातारा ), प्रदेशाध्यक्ष सावकार मदनाईक, जिल्हा अध्यक्ष अजित पवार, अनुष्का संकपाळ (एकोंडी), आप्पासाहेब पाटील ,ऋषिकेश ढोले (गोरंबे) यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सागर शंभुशेटे, तानाजी मगदूम,नितेश कोगनोळे,अरूण ढोले, दत्ता दंडवते, दत्ता पाटील केनवडेकर, रणजीत गायकवाड उपस्थित होते. आभार निशिकांत कांबळे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT