In the original village, the villagers were shocked by the defense 
कोल्हापूर

मूळ गावात रक्षाविसर्जनाचा अट्टहास नडला ग्रामस्थांना

सकाळ वृत्तसेवा

हालेवाडीचे मायलेक कोरोना पॉझिटिव्ह 

उत्तूर (कोल्हापूर) ः आजरा तालुक्‍यातील हालेवाडी येथे मुंबईहून पतीच्या अस्थी घेऊन आलेली महिला तिचा मुलगा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने उत्तूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनास्थळावरून व सरपंच संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील 56 वर्षीय व्यक्ती कुटूंबासह मुंबईत राहतात. एअर फोर्समधून निवृत झाल्यावर ते एका बॅंकेत नोकरीस होते. त्यांना उच्च रक्तदाबा होता. तीन दिवसांपूर्वी त्यांचे मुंबईत निधन झाले. त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार केले; मात्र रक्षाविसर्जनाचा विधी हालेवाडीत करण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला. याला ग्रामस्थांनी विरोध केला; मात्र विरोध डावलून ते रविवारी सकाळी गावी आले. एका गाडीत मृताची पत्नी, दोन अविवाहीत मुलगे व दुसऱ्या गाडीत मृताचा भाऊ, त्याची पत्नी व मुलगा असे सहाजण आले. गावी आल्यावर मृताचा मोठा भाऊ, त्याची पत्नी, व गावातील बहीण अशा नऊ जणांनी अस्ती विसर्जनचा विधी केला.

यानंतर मुंबईहून आलेल्या सहा जणांना आजरा येथे स्वॅब घेण्यासाठी पाठवले. त्यांना आजऱ्यात क्वारंटाईन केले. या सहा पैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामुळे गावच्या सीमा बंद केल्या. गावात आरोग्य, महसूल, पोलिस पथक दाखल झाले आहे. दरम्यान, तहसीलदार विकास अहीर, सहाय्यक पोलिस निरीक्षक भांगे यांनी दक्षता समितीला सुचना दिल्या. विस्तार अधिकारी पी. जी.चव्हाण, ग्रामसेवक डी. जी. परीट तलाठी भोई, सहाय्यक फौजदार कोचरगी, सतीश वर्णे दिवसभर गावात थांबून होते. 

मृतदेह आणायचा होता गावी 
त्या व्यक्तीचे निधन झाल्यावर कुटुंबाने गावातील दक्षता समितीशी संपर्क साधून मृतदेह गावी आणणार, असल्याचे सांगितले. मात्र समितीच्या सदस्यांनी विरोध करत अंत्यसंस्कार मुंबईतच करण्याचा सल्ला दिला. नंतर रक्षाविसर्जन गावी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी कुटुंब गावी आले. समितीने त्यांच्या कागदपत्राची छाननी केली. त्यांच्याजवळ ई-पास व मृत्यू दाखला होता. 

शनिवारपर्यंत दुकाने बंद 
घटनेनंतर परिसरातील आरदाळ, वडकशिवालेच्या सीमाही बंद केल्या. उत्तूरमधील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. शनिवारपर्यंत दुकाने बंद राहतील, असे व्यापारी अशोसिएशनने जाहीर केले. 

कसून चौकशी केली असती तर... 
हालेवाडी येथील मुंबईत मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा मृत्यू न्यूमोनियाने झाल्याचे त्याच्या मृत्यूच्या दाखल्यात नमुद आहे. ती व्यक्तीला उच्च रक्त दाब, मधुमेह होता. त्यांच्यावर मुंबईतील खाजगी रुग्णालयात उपचार केले. प्रकृती गंभीर बनल्यावर त्यांना के. ई.एम. रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले. मात्र रुग्णालयाच्या दारातच त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयाने त्यांना न्यूमोनियाने मृत्यू झाल्याचा दाखला दिला. रुग्णालयाने कसून चौकशी केली असती, तर.. अशी चर्चा होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Shravan 2025 Food Avoid: श्रावणात नॉन व्हेज टाळताय? मग प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' 5 शाकाहारी पदार्थांचा करा आहारात समावेश

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

SCROLL FOR NEXT