ramai awas policy not working properly in kolhapur 600 people are deprived 
कोल्हापूर

जुनी घरे पाडून लोकांवर बेघर होण्याची वेळ आली ; ६०० कुटुंब निधीविना अधांतरीच

शिवाजी यादव

कोल्हापूर : जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय आणि बेघरांना घरे बांधून देण्यासाठी रमाई योजना राबविण्यात येते. या अंतर्गत गेल्या वर्षी जिल्ह्यातील ६०० वर घरे बांधण्यात येणार होती; पण निधी नसल्याने ही घरकुले अस्तिवात आली नाहीत. त्यामुळे दुर्बल घटकातील लोकांच्या राहण्याचा प्रश्‍न अधांतरी आहे.

रमाई घरकुल योजनेसाठी समाजकल्याण विभागाकडून प्रस्ताव मागविण्यात आले. यात जिल्ह्यातील ६०० वर लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर झाले. समाजकल्याणकडून तोंडी सूचना आल्यानंतर जुनी घरे लोकांनी पाडून तेथे पायाभरणी केली. निधी येताच बांधकाम करू शकता, असेही सांगितले गेले होते; मात्र प्रत्यक्ष सहा महिने झाले तरी निधी आलेला नाही. बहुतेक बेघरांची जुनी घरे पडली होती. त्यामुळे त्यांना रिकाम्या जागेत शेड मारून राहण्याची वेळी आली. काहीजण समाज मंदिरात राहण्यास गेले, तर काहींनी अन्यत्र स्थलांतर केले. अशात कोरोनाच्या संसर्गाचा काळ आला. यात कच्ची घरे पाडण्यात आली.

नवीन घरांचे बांधकाम नाही. त्यामुळे हक्काचे घरही नाही. लॉकडाउनमुळे रोजगार नाही. त्यामुळे भाड्याच्या घरात राहता येत नाही. जागा असल्यामुळे ती सोडता येत नाही. अशा विविध समस्यांत दुर्बल, बेघर घटक सापडले आहेत. लॉकडाउन शिथिल झाला. शासकीय कार्यालये सुरू झाली आहेत; मात्र राज्य शासनाकडून समाजकल्याण विभागाकडे निधी आलेला नाही. हा निधी केव्हा येणार, याचे उत्तर मिळत नाही. दुर्बल घटक पुण्या, मुंबईच्या आयुक्तालयाकडे जाऊन दाद मागू शकत नाहीत.

"रमाई घरकुल योजनेसाठी निधी देण्यात चालढकल करून शासनाने थट्टा केली आहे. चालू आर्थिक वर्षात निधीची तरतूद केली होती. तोंडी सूचनेद्वारे जुनी घरे पाडून नवीन बांधण्यात येणार होती. पावसाळा संपला तरी बांधकामासाठी निधी आलेला नाही. यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयासमोर १ जानेवारीला ठिय्या आंदोलन करणार आहे."

- शहाजी कांबळे, पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष, आरपीआय (आठवले गट)

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Solapur Accident : तुळजापुरला जाताना काळाचा घाला, कोल्हापूर–सोलापूर रस्त्यावर भीषण अपघातात कसबा बावड्यातील दाम्पत्य ठार

फक्त 10,999 मध्ये खरेदी करा 50MP सेल्फी कॅमेरा; AI फीचर्स, iPhone सारखा जबरदस्त मोबाईल, 31 मार्चपर्यंत 14 हजारचा डिस्काउंट

Latest Marathi News Live Update : बच्चू कडू यांनी भोंदू बाबा अशोक खरातची भेट घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल

Jalgaon Crime : चॉपर हल्ल्यातील जखमी तरुणाचा अखेर मृत्यू; 500 रुपये न दिल्याने पोटात केले होते वार, दहा तास मृत्यूशी झुंज अयशस्वी

LPG Gas : गॅस तुटवड्यात काळाबाजार तेजीत; कोल्हापुरात घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर उघड

SCROLL FOR NEXT