raosaheb danve criticism on congress 
कोल्हापूर

कॉंग्रेसची भूमिका शेतकरी विरोधी ; मंत्री रावसाहेब दानवे यांचा आरोप. 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - नव्या कृषी विधेयकामुळे बाजार समितीमधील दलालांच्या वर्चस्वाला धक्का बसणार आहे. कृषी मालाला किमान आधारभूत किंमतीपेक्षा अधिक दर मिळेल. "एका बाजूला काटा आणि दुसऱ्या बाजूला नोटा' असे चित्र बाजारसमितीमध्ये असेल. तरी देखील कॉंग्रेसचा या विधेयकाला विरोध आहे. त्यांची भूमिका नेहमीच शेतकरी विरोधी राहीली आहे. असा आरोप ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. शासकीय विश्रामगृहातील शाहू सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

यावेळी दानवे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दीष्ठ ठेवले आहे. त्यादृष्टीकोनातून नव्या कृषी विधेयकामध्ये अनेक आवश्‍यक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. या विधेयकामुळे बाजार समित्या बंद होतील असा कांगावा केला जातो. मात्र बाजार समित्या तशाच सुरू राहणार आहेत. पूर्वी केवळ बाजार समितीचा परवाना असणाराच व्यापारी कृषीमाल खरेदी करू शकत होता. त्यामुळे ते आपासात ठरवून शेतमालाचा भाव पाडत होते. आता ज्याचे पॅनकार्ड आहे असा कोणही व्यक्ती बाजार समितीमधून कृषी माल खरेदी करू शकतो. त्यामुळे बाजार समितीमधील स्पर्धा वाढेले. या स्पर्धेतून शेतीमालाला अधिक दर मिळेल. कृषी मालाची किमान आधारभूत किंमत कायम असून केंद्र सरकार ती दरवर्षी वाढवत आहे. करारशेतीमध्ये केवळ पिकाचा करार होईल जमिनीचा होणार नाही. जमिनीची मालकी शेतकऱ्यांचीच असले. हे कृषी विधेयक शेतकऱ्यांना बंधनमुक्त करणारे असून कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणारे आहे. पण कॉंग्रेसकडे आता सांगण्यासारखा कोणताच मुद्दा नाही. त्यामुळे ते कृषी विधेयकाला राजकीय विरोध करत आहेत. त्यांनी दहा वर्षात स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू तेल्या नाहीत. कारण त्यांची भूमिका नेहमीच शेतकरी विरोधी राहीली आहे. 

या पत्रकार परिषदेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, राहुल चिकोडे, देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, कृषी आघाडीचे प्रमूख भगवान काटे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

  
ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली मान्यता 
दानवे म्हणाले, कृषी विधेयक बनवण्यापूर्वी सर्व मुख्यमंत्र्यांची एक समिती बनवली होती. या समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या समितीच्या शिफारसींचा समावेश करूनच कृषी विधेयक बनवले. तरी देखील शिवसेनेचा या विधेयकाला लोकसभेत पाठिंबा तर राज्यसभेत विरोध आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: महाराष्ट्रात पालटू शकतो गेम? आमदार फोडले पण उद्धव ठाकरेंचे खासदार फोडणे शिंदेंसाठी सोपे नाही; Inside Story काय?

Central Railway: कर्मचाऱ्यांचे हाल होणार! मध्य रेल्वेवर 2 दिवस विशेष ब्लॉक, काही लोकल रद्द; वेळापत्रकातही बदल, वाचा सविस्तर

पुण्यात गोळीबाराचा थरार! गुन्हेगाराला पकडायला गेल्यावर अचानक गोळीबार, पोलिसांनीही दिलं प्रत्युत्तर, काय घडलं?

Vaibhav Suryavanshi: वैभव सुर्यवंशीची फटकेबाजी पाहिली का? Video जो गोलंदाजांत धडकी भरवतोय, जबरदस्त विक्रम अन्...

Latest Marathi News Live Update : पातूर नगरपालिकेत काँग्रेस-उबाठा आघाडीची सरशी; इद्दू पैलवान नगराध्यक्षपदी विजयी

SCROLL FOR NEXT