Vegetable Market esakal
कोल्हापूर

Vegetable Market : टोमॅटोसह भाज्यांचे दर उतरले; कडधान्य, मसाले, किराणा साहित्य, खाद्य तेलांच्या दराची काय स्थिती?

फळ बाजारात नव्या हंगामातील सफरचंदाची (Apple) आवक वाढली आहे.

सकाळ डिजिटल टीम

कांदा २०-३० तर बटाटा २५-३० रुपये किलोने विकला जात आहे. मात्र लसूण अद्यापही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.

निपाणी : या आठवड्यात येथील भाजी मंडईत (Vegetable Market) सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक समाधानकारक झाल्याने दर थोडे उतरले आहेत. मागणीच्या तुलनेत कोथिंबिरीची आवक वाढल्याने १० रुपयाला तीन-चार पेंड्या मिळत आहेत.

पालक, पोकळा, मेथी, तांदळी, करडई यासारख्या भाज्या १० रुपयाला एक पेंडी आणि २० रुपयाला तीन पेंड्या मिळत आहेत. नवीन हंगामातील पडवळांची आवकही सुरू झाली आहे. प्रतिनग २०-२५ रुपयेप्रमाणे ते विकले जात आहे.

टोमॅटोचे दर उतरले असून, ३० ते ४० रुपयेप्रमाणे विक्री होत आहे. दोडका, वांगी, कारली, सिमला मिरची, ओली मिरची, बीन्स, घेवडा, पापडी यासारख्या फळभाज्या आणि शेंगभाज्या ४० ते ६० रुपये किलो तर दिडका ३० ते ४० रुपये किलोने विकला जात आहे. कांदा, बटाट्याचे दर स्थिर आहेत.

कांदा २०-३० तर बटाटा २५-३० रुपये किलोने विकला जात आहे. मात्र लसूण अद्यापही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. धान्य बाजारात गहू, तांदूळ, ज्वारीचे दर तेजीत स्थिर आहेत. श्रावण मासानिमित्त सण-सोहळे सुरू झाल्याने गहू, हरभरा डाळ, गूळ यांना मागणी वाढली आहे. कडधान्ये आणि डाळींच्या दरात अद्यापही तेजीच आहे‌. मसाले, किराणा साहित्य, खाद्य तेलांचे दर स्थिर आहेत.

फळ बाजारात नव्या हंगामातील सफरचंदाची (Apple) आवक वाढली आहे. नव्या-जुन्या सफरचंदाचे प्रतवारीनुसार दर ८०-१६० रुपये किलो असे आहेत. उपवासाचे दिवस असल्याने केळीच्या दरातही तेजी आहे. वसई ४०-५० तर जवारी ५०-८० रुपये प्रति डझन असे दर आहेत. मोसंबी, पेरू, सिताफळ, डाळिंब यांची आवक चांगली आहे. दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT