rbi cancels license of kolhapur ichalkaranji shivam cooperative bank 
कोल्हापूर

मोठी बातमी - कोल्हापुरातील सहकारी बँकेचा परवाना रद्द; रिझर्व्ह बँकेची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी - येथील शिवम सहकारी बँकेचा परवाना भारतीय रिझर्व्ह बँकेनेकडून रद्द करण्यात आला आहे. शिवम बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने आरबीआयने ही कारवाई केली आहे. आरबीआयने याआधीच शिवम बँकेवर आर्थिक निर्बंध लादले होते. त्यानंतर आता परवानाच रद्द केल आहे. 

 शिवम बँकेतील २४ कोटी ४० लाखांचा घोळ केल्याप्रकरणी बँकेच्या अध्यक्षांसह एकूण ३७ जणांवर पोलिसात  गुन्हा दाखल झालेला आहे. आता बँकेचा थेट परवाना रद्द झाल्याने महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. याआधी आरबीआयने कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द केला होता. पुरेसे भांडवल नसल्याने आरबीआयने हा मोठा निर्णय जाहीर केला. शिवम सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल नाही. त्यामुळेच बँकेचा परवाना तत्काळ रद्द करण्यात येत आहे. २९ जानेवारी २०२१ पासून बँकेला कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत, असं आरबीआयने कारवाईदरम्यान म्हटले आहे. शिवम सहकारी बँकेचा परवाना रद्द झालेला असला तरी खातेधारकांना आरबीआयने दिलासा दिला आहे. पैसे जमा करणाऱ्या ९९ टक्क्यांहून अधिक खातेधारकांची रक्कम इन्श्युरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडे आहे. बँकेत पैसे जमा असलेल्या खातेधारकांना डिपॉझिट इन्श्युरन्स क्लेम मिळणार आहे, अशी माहिती आरबीआयने दिली आहे, त्यामुळे येथील खातेधारकांना दिला दिलासा मिळाला आहे.

पैसे जमा करणाऱ्या 99 टक्क्यांहून अधिक खातेदारांची रक्कम इश्युरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडे आहे. बँक बंद झाली असली तरी लिक्विडेशननंतर बँकेत पैसे जमा असलेल्या खातेदारांना डिपॉझिट इन्श्युरन्स क्लेम मिळणार आहे. ज्यांनी बँकेत 5 लाख रुपये जमा केलेले आहेत, त्यांचा याचा लाभ मिळणार आहे. आरबीआयने महाराष्ट्रीतल रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीला निर्देश दिले आहेत की, बँकेला बँद करण्याचे निर्देश जारी करावेत. बँकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. शिवम सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्यानं बँक चालून ठेवणं म्हणजे पैसे जमा करणाऱ्या खातेदारांवर अन्याय होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train AI Fake Tickets : मुंबई लोकल ट्रेनसाठी ‘AI’द्वारे बनावट तिकिटे तयार करणाऱ्यांना होवू शकते पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Crime: डोळे काढले, शरीरावर १५० जखमा अन्...; १४ वर्षीय प्रेयसीसोबत भयंकर कृत्य, ४८ वर्षीय प्रियकराने क्रूरतेच्या मर्यादा ओलांडल्या

IND vs SA: 'ऋतुराजला एका अपयशामुळे टीम इंडियातून काढू नका, मी हात जोडले...', माजी क्रिकेटरची विनंती

Army Jawan : देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या जवानाचा यथोचित सन्मान; सैनिकाच्या 'त्या' कृतीने जिंकली मने, असं काय केलं?

PMC Hoarding Fee : होर्डिंग शुल्क दरवाढीचा ठराव शासनाकडून रद्द; महापालिकेला मोठा झटका!

SCROLL FOR NEXT