Read Football Coach Shabbir Ali's Tips Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

दृष्टिकोनामुळेच बंगालची हुकूमत, वाचा फुटबॉल प्रशिक्षक शब्बीरअली यांच्या सरस टिप्स्

दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : राष्ट्रीय स्तरावर तेरा वर्षे स्ट्रायकर म्हणून मैदान गाजविले. हेडिंगसाठी टायमिंग महत्त्वाचे मानल्याने ओळख बनली. फुटबॉल प्रशिक्षक म्हणून दोन दशके बंगाल, महाराष्ट्र, गोवा, राजस्थान राज्यात जबाबदारी पेलली. मोहामेडन स्पोर्टिग, साळगावकर फुटबॉल क्‍लब, चर्चिल ब्रदर्स, महिंन्द्रा युनायटेड या दिग्गज संघाना मार्गदशन केले. यात बंगालच्या खेळाडूंचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक दिसला. त्यामुळेच बंगालची भारतीय फुटबॉल क्षेत्रावर हुकूमत असल्याचे मत ध्यानचंद पुरस्कार विजेते प्रशिक्षक शब्बीरअली यांनी व्यत केले.

इंडियन फुटबॉल कोचेस असोसिएशनतर्फे आयोजित द लिजंड कोचेस ही मुलाखतीची मालिका समाजमाध्यमावर सुरू आहे. यात दुसरे पुष्प गुंफताना शब्बीरअली बोलत होते. निवेदक अर्जुन पंडित यांनी ही मुलाखत घेतली. कोणत्याही खेळाडूचा पहिला प्रशिक्षक हा पालक असतो. त्यामुळे घरातून प्रोत्साहन असेल तरच अधिक गतीने प्रगती साधता येते. आपल्या देशातील नवी पिढी यादृष्टीने सुदैवी आहे. त्यामुळे मैदानावरील खेळात करिअरसाठी बळ देणारे पालकांचे चित्र सुखावणारे आहे. प्रशिक्षक म्हणून खेळाडूंना समजून घेणे महत्त्वाचे आहे. अनेक नामवंत संघाना प्रशिक्षण दिले तरी कधीच स्टार खेळाडूचा आग्रह धरला नाही. उलट शिस्तबध्द होतकरू खेळाडूच्या मदतीने यशाची शिखरे सर केली. 

हेडद्वारे हमखास गोल नोंदविणारे म्हणून शब्बीरअली यांची खासियत होती. यामागील सिक्रेट सांगताना ते म्हणाले, ""माझी उंची कमी असूनही केवळ अधिक सरावाद्‌वारे हेडिंगचे कौशल्य वाढविले. न्यूनगंड न बाळगता झोकुन देवून संधी साधण्यावर भर दिला. विशेषतः टायमिंगवर लक्ष केंद्रित केल्याने यशस्वी ठरलो. स्ट्रायकरने सतत संधीच्या शोधात राहिले पाहिजे. प्रतिस्पर्ध्याच्या उणीवाचा फायदा उठविणाराच आघाडीपटू सफल ठरत असतो.'' 

हैद्राबादला गतवैभव मिळेल... 
शब्बीरअली म्हणाले, ""1960 ते 80 या दोन दशकात फुटबॉलमध्ये हैद्राबादचा दबदबा होता. हैद्राबाद पोलिस संघाने देशातील अव्वल स्पर्धा जिंकल्या. भारतीय संघात किमान अर्धा डझन खेळाडू असायचे. पण, गेल्या काही वर्षांत व्यावसायिक संघ नसल्याने हे केंद्र फुटबॉलपासून दूरावले होते. आता इंडियन सुपर लिग (आयएसएल), इंडियन फुटबॉल लिगमध्ये (आय लिग) संघ झाल्याने स्थानिक फुटबॉलपटूंना प्रेरणा मिळत आहे. परिणामी, हैद्राबादला गतवैभव मिळू शकेल.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT