Remedies by Vita Municipality for Corona Prevention 
कोल्हापूर

'ते' गलाई बांधव शहरात आले तर आम्हाला कळवा....

सकाळ वृत्तसेवा

विटा - सर्व क्षेत्रातील, सर्व स्तरातील नागरिकांनी योग्य काळजी घेतली, तर कोरोना आपल्यापासून दूर राहील. शासनाच्या सर्व यंत्रणा अत्यंत सक्षमपणे कार्यरत आहेत. काळजीपोटी विटा नगरपरिषद कोरोना बाबतच्या जास्तीत जास्त उपाययोजनांचा अवलंब करीत आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले व संबंधितांनी गर्दी होणारच नाही, याची दक्षता घेतली तर चांगले होईल. काळजी न करता, काळजी घेऊन सकारात्मकपणे कोरोना व्हायरसच्या समस्यांना सामोरे जाणे गरजेचे आहे, असे मत विटा नगरपरिषदेचे प्रतोद, माजी नगराध्यक्ष ऍड. वैभव पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

ऍड. पाटील म्हणाले,"सण, समारंभ, यात्रा, कार्यक्रम 31 मार्चपर्यंत होऊ देऊ नयेत. झालेच तर छोट्या स्वरुपात व्हावेत यासह वैद्यकीय सूचनांची अंमलबजावणी व्हावी. नगरपालिका प्रयत्न करीत आहे. अफवांमुळे लोकांच्या मनात अनाठायी भीती निर्माण होईल, असे वर्तन कुणीही ही होऊ देऊ नये. कोरोनाबाबत बोलतानाही माहिती व काळजी घेऊन बोलणे महत्त्वाचे आहे. स्वच्छता हाच संस्कार म्हणून शहरात सातत्यपूर्ण काम सुरू आहे. कोरोनाबाबत शंका, सूचना, तक्रार असेल तर सांगावी. पालिकेच्या माध्यमातून आवश्‍यक योग्य ती खबरदारी घेतली जाईल.'' 

मुख्याधिकारी अतुल पाटील म्हणाले,"कोरोनाचा प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने शक्‍य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. विविध भागात व खास करून सार्वजनिक ठिकाणी काटेकोरपणे स्वच्छता राखली जात आहे. विटे शहर व परिसरातील गलाई बांधव देशात व देशाबाहेर आहेत. त्यापैकी कुणी शहरात आले तर नगरपरिषदेला माहिती द्यावी. योग्य ती खबरदारी घेता येईल.'' 
नितीन चंदनशिवे यांनी स्वागत केले. उपनगराध्यक्ष ऍड. अजित गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. फिरोज तांबोळी, प्रशांत कांबळे, कुलदीप भिंगारदेवे, विनोद पाटील यांची उपस्थिती होती.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blood Donation Rules: 'हे' लोक रक्तदान करू शकत नाहीत, निर्बंध का? सर्वोच्च न्यायालयात सरकारचा खुलासा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार, येत्या मंगळवारी घोषणेची शक्यता

Pune News: रुग्णालयांच्या अवाजवी बिलांना आता बसणार चाप; आरोग्यमंत्र्यांकडून ‘स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल’ची महत्त्वपूर्ण घोषणा..

ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा धमाकेदार डान्स, एनर्जी इतकी की तरुणांना सुद्धा लाजवेल, Viral Video

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

SCROLL FOR NEXT