‘देवस्थान’च्या सुरक्षारक्षकांबाबत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल  
कोल्हापूर

‘देवस्थान’च्या सुरक्षारक्षकांबाबत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल

करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील माजी सैनिक सुरक्षारक्षकांबाबतची अंतिम सुनावणी गुरुवारी झाली

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील माजी सैनिक सुरक्षारक्षकांबाबतची अंतिम सुनावणी गुरुवारी झाली. सुनावणीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने सचिव शिवराज नाईकवडे यांनी विविध कागदपत्रे सादर केली. निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांच्यापुढे ही सुनावणी झाली. लवकरच याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिला जाणार आहे.

अंबाबाई मंदिरातील सुरक्षेसाठी २००६ ला सुरक्षारक्षक नेमले होते. त्यांनी कामगार कायद्याप्रमाणे वेतन मिळावा, कायम करावे व इतक्या वर्षांच्या फरकाची रक्कम द्यावी, अशी मागणी करून न्यायालयात दावा दाखल केला होता. त्याचा निकाल लागूनही देवस्थान समितीकडून मागण्यांची पूर्तता होत नसल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यानुसार ही सुनावणी आज पूर्ण झाली.

दरम्यान, देवस्थान समितीच्या कारभाराबाबत विविध संस्था, संघटनांनी निवेदने दिली आहेत. अशा विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. त्यांच्या तक्रारींचा आढावा या वेळी घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

Marathi News Live Updates : एनडीए "१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात 'सेवा संकल्प' अभियान' राबवणार : अमित शहा

SCROLL FOR NEXT