republic day jalebi story sangli kolhapur marathi news 
कोल्हापूर

मतदारांचा दिवस होणार गोड ;  प्रजासत्ताक दिनी ‘कॅश’करण्याचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : एरव्ही प्रजासत्ताक दिन म्हणजे शासकीय ध्वजवंदन, त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम, गल्लोगल्ली उभारलेले जिलेबीचे स्टॉल, त्यावर दिवसभर लावलेली  देशभक्तिपर गीते असा सगळा माहोल; पण यावेळी महापालिका निवडणुकीची किनार या उत्सवाला असून, त्यातून काही प्रभागात मतदारांना जिलेबी वाटपाचे नियोजन इच्छुकांनी केले आहे. त्यासाठी कोल्हापूरसह जिलेबीसाठी प्रसिद्ध असलेल्या कुंडल (जि. सांगली) येथूनही ५०० ते १००० किलो जिलेबीची मागणी केली आहे.


दरवेळी महापालिकेची निवडणूक दिवाळीच्या तोंडावर येते. त्यावेळी प्रत्येक प्रभागात उमेदवारांकडून दिवाळी साहित्याची भेट ठरलेली असते. अपवाद वगळता सर्वच उमेदवारांकडून मते खेचण्यासाठी ही क्‍लुप्ती लढवली जाते. यावेळची निवडणूक मात्र त्याला अपवाद ठरली आहे. कोरोनामुळे महापालिकेची निवडणूकच पुढे ढकलली. त्यामुळे खर्च कमी झाल्याच्या आनंदात आहेत; पण आता विरोधकांनी जिलेबी वाटपाचे नियोजन केल्याने आपणही कुठे कमी पडू नये या भावनेतून एकाच प्रभागात अनेकांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. यातून मतदारांचा दिवस मात्र गोड होणार आहे. 

महापालिकेची आरक्षण सोडत झाल्यानंतर इच्छुकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणुकीत उतरण्याची सलामी दिली आहे. त्यानंतर नववर्षाच्या स्वागताचे आणि अलिकडेच झालेल्या मकर संक्रांतीचे शुभेच्छांचे फलक आणि सोशल मीडियावर आभाळभर त्याच्या शुभेच्छा देण्यात आला. महापालिकेची निवडणूक एप्रिल-मेमध्ये होईल. या काळात दुसरा कोणाताही मोठा सार्वजनिक सण नाही. त्यामुळे प्रजासत्ताक दिनही ‘कॅश’ करण्याचा प्रयत्न इच्छुकांनी सुरू केला आहे. उद्या जिलेबी वाटपाच्या निमित्ताने थेट मतदारांशी संपर्क करण्याचे नियोजन आहे. 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एबी डिव्हिलियर्स, ऐकतोस ना! प्लीज मला मदत कर... सूर्यकुमार यादवची आफ्रिकेच्या दिग्गजाला विनंती; म्हणाला, माझं करियर वाचव..

बिहार मतदानापूर्वी राहुल गांधींचा 'हायड्रोजन बॉम्ब', केंद्राने कसं मॅनेज केलं, धक्कादायक आरोप अन् पुरावे एका क्लिकवर

Uddhav Thackeray In Beed : ''फडणवीस दगाबाज, सत्तेबाहेर करणं हाच पर्याय''; ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद, बच्चू कडूंच्या आंदोलनावरही बोलले...

Solapur Crime: 'साेलारपुरात महिला डॉक्टरचा रुग्णाकडून विनयभंग'; न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी..

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या पोस्टची रंगली चर्चा; म्हणाली- शेवटचा दिवस....

SCROLL FOR NEXT