request to collector daulat desai to kolhapur people do not together to celebrate a 31st in kolhapur 
कोल्हापूर

31 डिसेंबरला तलाव, उद्यान, नदीघाटावर गर्दी नको ; कोल्हापुरकरांना जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

सुनील पाटील

कोल्हापूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आज वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पंचगंगा घाट, रंकाळा, इतर तलाव, उद्यान, नदीघाटावर गर्दी करु नये. नवीन वर्षाचे स्वागत घरीच आणि साधेपणाने करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले आहे. 

देसाई म्हणाले, 31 डिसेंबर ला नागरिकांनी तलाव, उद्याने, नदीघाट अशा सार्वजनिक ठिकाणी गर्दी करतात. तसेच, याठिकाणी फिरताना सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. रंकाळा तलाव, कळंबा तलाव, नदी घाट परिसर, उद्याना ठिकाणी गर्दी करु नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्‍यतो घराबाहेर जाणे टाळावे.

नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये. मिरवणुका काढण्यास मनाई आहे. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात, अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या पाहिजेत. 

ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. फटाक्‍यांची आतिषबाजी करण्यात मनाई आहे. कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. असे आवाहनही देसाई यांनी केले आहे. 

31 डिसेंबरसाठी जिल्हा प्रशासनाच्या सूचना : 

  • रंकाळा, पंचगंगा घाट, उद्यान, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये 
  • फटाके फोडू नये 
  • ज्येष्ठ नागरिग, लहान मुलांनी घरीच रहावे 
  • सुरक्षित अंतर राखावे 
  • मास्क वापरावा 
  • ध्वनीप्रदुषणा होणार नाही याची काळजी घ्यावी 

संपादन - स्नेहल कदम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

W,W,W,W,W! अर्शदीप सिंगचा तिखट मारा, प्रतिस्पर्धी झाला कावराबावरा; न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी ठोकला दावा, पण मिळणार नाही संधी

Leopard Attack Boy : थरारक! बिबट्याने दुचाकीस्वाराचा केला पाठलाग, कुत्रा असेल म्हणून गाडी हळू घेतली अन्...

Latest Marathi News Live Update : आम्ही आरोप केले तर अडचण होईल, भाजपचा अजितदादांना इशारा

१२ जानेवारीपासून कलर्स मराठीवर मोठे बदल; ४ मालिकांची वेळ बदलली, तर 'ही' गाजलेली मालिका घेणार निरोप

Mustafizur Rahman बाबत फैसला झाला, बीसीसीआयने KKR ला स्पष्टच सांगितले; पण, बांगलादेशी खेळाडूला द्यावे लागणार ९.२० कोटी?

SCROLL FOR NEXT