reservation date of sarpanch declared for 27 january in kolhapur 
कोल्हापूर

ब्रेकिंग ; अखेर प्रतिक्षा संपली ; सरपंच आरक्षण सोडत 27 जानेवारीला

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यातील 1025 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 27 जानेवारी रोजी काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी यासंदर्भातल्या आदेश आज काढले. जिल्ह्यातील 433 ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच झाल्या आहेत. तथापि त्या गावातील सरपंच पदाचे आरक्षण निश्चित झाले नव्हते. गेल्या पंचवीस वर्षांत पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंच पदाच्या आरक्षण तातडीने काढले जात आहे.

या आरक्षण सोडतीत नुकत्याच निवडणूक झालेल्या 433 ग्रामपंचायती बरोबरच 2025 पर्यंत मुदत संपणाऱ्या सर्वच म्हणजे 1025 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात येईल. या सोडतीबाबत गावांगावात प्रचंड उत्सुकता असून ज्या गावात काठावरील बहुमत आहे, अशा गावातील सदस्य सहलीवर पाठवण्याचे नियोजन सुरू आहे.

संपादन - स्नेहल कदम  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी त्यांची खाती इतर मंत्र्यांकडे सोपवली; मोठं कारण आलं समोर, पडद्यामागे नेमकं काय घडलं?

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्डरेकॉर्ड

IND vs SA: अरे बॉल दे ना... ! अहमदाबादमध्ये द. आफ्रिकेचा खेळाडू चाहत्यांवर भडकला; Video Viral

बेकायदा इमारत होणार भुईसपाट! उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाचा पवित्रा; नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाचा भाजीपाला, फळबागांना फटका

SCROLL FOR NEXT