Fraud in Mahatma Fule Jivandayini Scheme.gif 
कोल्हापूर

सेल्फी वुईथ पेशंट'ला जयसिंगपुरात प्रतिसाद ; डॉक्टरांनी जपले सामाजिक भान 

सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर (कोल्हापूर) : लॉकडाऊनच्या काळातही शहरातील रुग्णालये सुरु राहून रुग्णांवर उपचार झाले पाहिजेत या विचारातून दररोज रुग्णालयात रुग्णांवर उपचार होत असल्याचे सेल्फी काढून ते वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोरवर्ड केले जात आहेत. यातून शहरातील डॉक्टरांच्या सेवाभावीवृत्तीचे दर्शन झाले आहे. जयसिंगपूर मेडिकल असोसिएशन व इंडियन मेडिकल असोसिएशनने लॉकडाऊनच्या काळात रुग्णांसह शासनाला दिलासा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हा एकमेवा उपक्रम चर्चेत आला आहे. 

लॉकडाऊनच्या काळात शहरातील अपवाद वगळता सर्वच रुग्णालयांमध्ये रुग्ण सेवा सुरु आहे. सुरुवातीच्या काळात काही रुग्णालये बंद असल्याने याच्या तिखट प्रतिक्रिया उमटल्या. अगदी पत्रके काढून डॉक्टरांनी बंद न पाळता सेवा बजावली पाहिजे. रुग्णांना खऱ्या अर्थाने आता आपली गरज असल्याचे सांगावे लागले. जयसिंगपूर व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शक्कल लढवत शहरातील सर्वच हॉस्पिटल्स सुरु रहावीत यासाठी दररोज रुग्णांबरोबर सेल्फी घेऊन ते आपल्या ग्रुपवर टाकले जावेत. ते तालुका आणि ग्रामीण वैद्यकीय अधिकारी आणि जयसिगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना फॉरवर्ड केले जावेत अशी कल्पना पुढे आली. 

गेल्या काही दिवसापासून याला चांगला प्रतिसाद मिळत असून रुग्णांनाही उपचार मिळत आहेत. शिरोळ तालुक्यातील मोठे शहर म्हणून जयसिंगपूरकडे पाहिले जाते. शिवाय, वैद्यकीयदृष्ट्या अद्ययावत अशा उपचाराच्या सुविधा याठिकाणी आहेत. लॉकडाऊनच्या काळात शहरातील सर्वच रुग्णालयांच्या ओपीडी निम्म्याहून अधिक कमी झाल्या असल्या तरी डॉक्टरांनी मात्र सेवाभावीवृत्तीने रुग्णांची सेवा करण्याचे ब्रीद जोपासले आहे. काही डॉक्टरांकडून मात्र उपक्रमाबाबत नापसंती व्यक्त केली आहे. 

शहर आणि परिसरातील रुग्णांना लॉकडाऊनच्या काळातही सेवा दिली जावी या उद्देशाने हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे. याला शहरातील डॉक्टरांनी प्रतिसाद दिल्याने आज कोणीही रुग्ण उपचाराविना रुग्णालयाच्या दारातून परत जाताना दिसत नाही. सामाजिक भान राखूनच डॉक्टर मंडळींनी या उपक्रमाला प्रतिसाद दिला आहे. 

-डॉ. अतिक पटेल (अध्यक्ष, जयसिंगपूर मेडिकल असोसिएशन) 

जयसिंगपूरमधील रुग्ण सेवा लॉकडाऊनच्या काळातही सुरळीत आहे. ही बाब आमच्यासाठी अभिमानाची आहे. शहरातील सर्वच डॉक्टर मंडळी यासाठी कौतुकास पात्र आहेत. 

डॉ. अतुल घोडके, (अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, जयसिंगपूर)


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT