कोल्हापूर : त्यांची कल्पकता अनेकांना रोजगार देणारी ठरली, त्यांनी सुरू केलेल्या व्यवसायामुळे अनेक नव्या औद्योगिक संकल्पना प्रत्यक्षात उतरल्या. ज्यावेळी स्टर्टअप हा शब्द अनोळखी होता, त्यावेळी त्यांनी ओपेक्स ही संस्था सुरू केली. आज ओपेक्सची व्याप्ती एवढी वाढली, की नव्या स्टार्टअपसाठी संजीवनी ठरत आहे. इचलकरंजीतील सचिन आणि अंजोरी कुंभोज या दाम्पत्याची ही यशोगाथा आहे.
अंजोरी आणि सचिन हे दोघेही प्राध्यापक होते. सचिन फार्मसी आणि व्यवस्थापनमध्ये पदव्युत्तर तर अंजोरी कॉम्प्युटर इंजिनिअर म्हणून कॉलेजमध्ये बरीच वर्षे नोकरी केली होती. दोघांनीही 2016 ला नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर "ओपेक्स' नावानी दोघांनी पश्चिम महाराष्ट्रातील पहिले स्टार्टअप एक्सेलरेटर सुरू केले.
विद्यार्थ्यांनी नोकरीऐवजी स्टार्टअपसाठी तयार करणे हे उद्दिष्ट होते. स्टार्टअप सुरू करताना एखादे इनोवेशन असेल तर त्याचा प्रॉडक्ट कसा बनवावा?. स्टार्टअप साठी बिजनेस मॉडेल कसे बनवावे, तंत्रज्ञान कसे निवडावे, मार्केटिंग कसे करावे, फंडिंग कसं आणि कुठून मिळेल. या सर्व गोष्टींसाठी लागणारी प्रशिक्षण, मेन्टॉरिंग आणि नेटवर्किंग त्यांनी तयार केले. आज याअंतर्गत हेल्थकेअर, फूड, इ-कॉमर्स आणि ऍग्री क्षेत्रातील स्टार्टअपसाठी या सेवा चालू केल्या.
दरम्यान, त्यांनी "मेक मी हायर' हा एक नवा स्टार्टअप सुरु केला. यात ते हेल्थकेअर उद्योगांना रोजगारक्षम पदवीधर शोधण्यासाठी मदत करतात. यासाठी त्यांनी "स्किल टेस्ट'आणि "स्किल मॅपिंग' प्रणाली विकसित केली. याद्वारे बऱ्याच विद्यार्थ्यांना ते रोजगारक्षम आहेत, की नाहीत हे समजते. रोजगारक्षम होण्यासाठी कोणती कौशल्ये स्वतःमध्ये विकसित करावी, याचेही आकलन होते. भारतातील हा पहिला हेल्थकेअर नोकरी क्षेत्रातील असा स्टार्टअप आहे, जो स्किलवर आधारित आहे आणि ह्या स्टार्टअपला केंद्र शासनाच्या "स्टार्टअप इंडिया' कडून अधिकृत सर्टिफिकेशन मिळाले आहे.
36 स्टार्टअप्सना मेन्टॉरिंग
चार वर्षात ओपेक्ससोबतच मेक-मी-हायर, प्लॅन बी आणि सिरी असे आणखी तीन स्टार्टअप सुरु केले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात जवळजवळ सर्व नामांकित अभियांत्रिकी, फार्मसी आणि व्यवस्थापनातील महाविद्यालयांसोबत त्यांचे स्टार्टअप आणि इन्क्युबेशन सेंटरसाठी काम सुरु असते. आज 36 वेगवेगळ्या स्टार्टअप्सना ते मेन्टॉरिंग करत आहेत. ज्यासाठी त्यांच्याकडे असणाऱ्या 70 पेक्षा जास्त मेंटॉर्सची ती मदत घेतात.
4 वर्षात 10 हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
एखाद्याला इनोवेटिव्ह स्टार्टअप सुरु करण्यासाठी लागणाऱ्या सुविधा त्यांनी मजबूत नेटवर्किंगद्वारे देण्यास सुरुवात केली. "स्टार्टअप कसा आणि का सुरु करावा' यावर आधारित वेगवेगळ्या कॉलेजमध्ये प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. फक्त 4 वर्षात त्यांनी 10 हजार विद्यार्थ्यांना स्टार्टअपची प्रशिक्षण देण्याचा टप्पा पार केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.