retired colonel Sawant is sewing masks on a sewing machine in kolhapur 
कोल्हापूर

अहो, कर्नल साहेब तुम्ही चक्क शिलाई मशीन वर कसे...?

सुधाकर काशिद

कोल्हापूर - देशाची सेवा युद्धाच्या काळात रणगाडा चालवुनही करता येते आणि देशांतर्गत संकटाच्या काळात शिलाई मशीन चालवुनही करता येते याचे प्रत्यक्ष कृतीतून दर्शन निवृत्त कर्नल अमरसिंह सावंत यांनी घडवले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा संसर्ग रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहे. या प्रयत्नातील एक अनोखा खारीचा वाटा कर्नल सावंत यांनी उचलला आहे.

तीस वर्ष भारतीय सैन्यदलात रणगाडा विभागात कार्यरत असलेले कर्नल सावंत निवृत्तीनंतर शाहू नाक्याजवळील दादू चौगुले नगर मध्ये राहतात. लष्करातील सेवेच्या काळात त्यांच्या रणगाडा विभागाने वेगवेगळ्या मोहिमेत सहभाग घेतला. त्याचा थरारक अनुभव कर्नल सावंत यांच्या गाठीशी आला. आता ते निवृत्त झाले आहेत. पण देशसेवेची रग आजही अंगात कायम आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात तयार झालेले वातावरण पाहता प्रत्येक स्तरावर को रोमा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या वातावरणात गप्प घरात बसून राहतील तर ते कर्नल सावंत कसले? त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला व कोरोना संसर्ग रोखण्याच्या मोहिमेत एक निवृत्त कर्नल म्हणून कोणतीही जबाबदारी उचलण्याची तयारी दर्शवली.

प्रशासन जरूर अशा व्यक्तींना या कामात सामावून घेणार आहे पण त्याला काही कालावधी जाणार आहे. यादरम्यान कर्नल सावंत यांनी थांबून न राहता त्यांनी आपल्या परीने कोरोना संसर्ग रोखण्याचा एक भाग म्हणून मास्क शिवायचे ठरवले. त्यांनी घरातील जुने शिलाई मशीन तेलपाणी करूनव्यवस्थित बनवले. मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने घरात काही कपडे शिल्लक होते. मग हे कर्नल साहेब चक्क शिलाई मशीन वर बसले. त्यांच्या पत्नी सुधा व त्यांचा एक सहकारी हे दोघे मास्कच्या आकाराचे कापड कापून देऊ लागले. आणि लष्करातील सेवेच्या काळात रणगाडा चालवणारे कर्नल सावंत चक्क शिलाई मशीन चालवू लागले. हे तिघे जण मिळून दिवसभरात ही चाळीस मास्क बनवतात. मग कर्नल साहेब हे मास्क घेऊन शाहू नाक्याजवळ जातात. तेथून जाणाऱ्या कोणाच्या तोंडावर मास्क नाही त्याला आपल्याजवळचा मास्क मोफत देतात. मास्क काढायचा नाही असा सल्ला देतात. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घराबाहेर न पडणे किंवा पडावेच लागले तर तोंडाला मास्क बांधणे, जंतुनाशक वापरणे हेच मार्ग आहे. आणि आपण आपल्या परीने जे करता येईल ते करण्याचा एक भाग म्हणून कर्नल सावंत व त्यांच्या परिवाराने हा मार्ग स्वीकारला आहे. कर्नल सावंत यांना शिलाई मशीन वर बसलेले पाहून अनेक जण कर्नल साहेब तुम्ही चक्क शिलाई मशीन वर कसे? असे विचारतात पण देशावर एक आपत्ती असताना कोणतेही काम करण्यास आपण पण मागेपुढे पहायचे नसते या भावनेतून त्यांचा परिवार या कामात गुंतला गेला आहे
 

मी जरूर लष्करातून कर्नल पदावरून निवृत्त झालो आहे. निवृत्तीचे जीवन अगदी व्यवस्थित जगत आहे. मी व माझा परिवार घरी सुरक्षित राहू शकतो. पण मी ठरवले, या काळातही माझ्याकडून देशाची सेवा व्हावी म्हणून मी शिलाई मशीन वर बसून मास्क शिवत आहे. रणगाडा चालवणे जशी देश सेवा आहे तशी या कोरोना संसर्गाच्या काळात शिलाई मशीन चालवून मास्क बनवणे ही देखील देश सेवाच आहे

- कर्नल अमरसिंह सावंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : पंचगंगा नदीची पाणी पातळी चोवीस तासांत सहा फूट सहा इंचांनी वाढली

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT