Retired Sugar Workers Will Get Paid In Two Installment Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गोडसाखरच्या निवृत्त कामगारांना दोन हप्त्यांत पैसे मिळणार

सकाळवृत्तसेवा

गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या (गोडसाखर) सेवानिवृत्त कामगारांची ग्रॅच्युईटी व फायनल पेमेंटचे (कंपनी कालावधीतील) दीड कोटी रुपये दोन हप्त्यांत देत असल्याचे पत्र आज ब्रिस्क फॅसिलिटीज कंपनीने आंदोलक कामगारांना दिले. निवृत्त कामगारांनी हा प्रस्ताव मान्य केला आहे. 

जनरल मॅनेजर व्ही. एच. गुजर यांनी दिलेले लेखी पत्र कंपनीचे प्रशासकीय अधिकारी शाम हरळीकर यांनी आंदोलकांचे प्रमुख माजी संचालक शिवाजी खोत यांना आज दिले. कंपनीच्या 4 मार्च 2014 ते 20 डिसेंबर 2020 या कालावधीत निवृत्त झालेल्या 291 कामगारांच्या खात्यावर 75 लाखांचा पहिला हप्ता उद्या (ता. 20) आणि 75 लाखांचा दुसरा हप्ता 20 मार्च रोजी कंपनी वर्ग करणार आहे.

वेतनवाढीतील 15 टक्के फरक आणि 8 टक्के व्याजाची रक्कम उच्च न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून देण्याचे कंपनीने कबूल केले आहे. 4 मार्च 2014 पूर्वीचे व नंतरची देणी कोणी द्यावयाची, याची स्पष्टता होण्यासाठी उच्च न्यायालयात सुरू असलेल्या दाव्याचा निकाल दोन महिन्यांत लावून देऊन कंपनी न्यायालयाच्या निर्णयानुसार देय रक्कम देण्यास तयार असल्याचेही पत्रात नमूद केले आहे. 

या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी महादेव मंदिरात कामगारांची बैठक झाली. त्यात हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. खोत म्हणाले, ""निवृत्त कामगारांचे झालेले वय आणि आतापर्यंत त्यांची झालेली हेळसांड याचा विचार करून कंपनीचा तडजोडीचा प्रस्ताव मान्य केला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेला शब्द ते भविष्यात पाळतील आणि कोर्ट निकालानंतर इतर देणी देतील, यावर आमचा विश्‍वास आहे.

त्याला त्यांनी तडा जाऊ देऊ नये. सव्वा महिन्यात केवळ न्यायप्रविष्ट बाब असल्याचे सांगून कारखान्याने कामगारांची दिशाभूल केली आहे. आंदोलनाचे नेतृत्व कोण करत आहे, या इगोपेक्षा कारखाना अध्यक्षांनी व कंपनीने तातडीने कायदेशीर बाबी पूर्ण करून घ्याव्यात. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.'' 

आंदोलन सुरूच राहणार 
इतर देण्यांच्या मागणीसाठी कामगारांचे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका खोत यांनी जाहीर केली. कोरोनाची पार्श्‍वभूमी, एका कामगाराचा झालेला मृत्यू आणि उपचारात दाखल असलेल्या एका कामगाराची परिस्थिती लक्षात घेऊन रोज दहा कामगार आंदोलनाला बसतील. कारखाना व कंपनीने पूर्ण थकीत देणी देईपर्यंत हे आंदोलन सुरू राहील.  

 
संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

Stock Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; सेन्सेक्स 34 अंकांनी घसरला, बाजारात दबाव का दिसून येत आहे?

Tulsi Water Benefits: सकाळी तुळशीचे पाणी प्यायल्याने पावसाळ्यात 'या' 4 आजारांवर होईल मात

मराठमोळ्या गाण्यावर सोनालीचे इंग्लंडमध्ये ठुमके, कवितेवर केला हटके डान्स, व्हिडिओ व्हायरल

दादरची 'ती' ओळख होणार इतिहासजमा! अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेल्या कबुतरखान्याचा शेवटचा Video व्हायरल, लोक हळहळले

SCROLL FOR NEXT